मनसेचे ‘इंजिन’ राष्ट्रवादीच्या रुळावर; आघाडीला देणार बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:14 PM2019-04-13T18:14:20+5:302019-04-13T18:14:28+5:30

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत मनसे बुलडाण्यात आघाडीला बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मनसेचा जिल्ह्यात फार बोलबाला नसला तरी मर्यादीत स्वरूपात या पक्षाची वोट बँक आहे.

MNS 'engine' on the road of NCP in Buldhana | मनसेचे ‘इंजिन’ राष्ट्रवादीच्या रुळावर; आघाडीला देणार बळ

मनसेचे ‘इंजिन’ राष्ट्रवादीच्या रुळावर; आघाडीला देणार बळ

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव 
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत मनसे बुलडाण्यात आघाडीला बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मनसेचा जिल्ह्यात फार बोलबाला नसला तरी मर्यादीत स्वरूपात या पक्षाची वोट बँक आहे. बुलडाणा विधानसभेत गतवेळी दुसºया क्रमांकाची मते मनसेच्या उमेदवाराने घेतली होती. त्यामुळे मनसेचे ‘इंजिन’ राष्ट्रवादीच्या रूळावर ही बाब पाहता आघाडीला याचा फायदा होऊ शकतो, असा कयास आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँगे्रस व काँग्रेस आघाडीच्या पथ्यावर पडत आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मनसेच्या पदाधिकाºयांनी मागील आठवड्यामध्ये मनसे आघाडी सोबत असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आता मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या सोबत आल्याने शिवसेनेसाठी थोड्याबहुता प्रमाणात चिंतेची बाब ठरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या सहा महिन्यापूर्वी विदर्भाकडे विशेष लक्ष देवून अनेक ठिकाणचा आढावा घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे १७ ते २६ आॅक्टोबर २०१८  या दरम्यान विदर्भ दौºयावर असताना त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, बुलडाणा, मेहकर, लोणार, सिंदेखड राजा या मतदार संघात पदाधिकाºयांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तसेच लोणार येथे मुक्काम करून पदाधिकाºयांसमोर  केंद्र सरकारविरोधात आपली विरोधाची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरे यांच्या या दौºयानंतर जिल्ह्यातील थंडावलेल्या मनसेच्या पदाधिकाºयांमध्ये उर्जितावस्था निर्माण झाली होती. मनसेचे काही पदाधिकारी आपली मरगळ झटकुन कामालाही लागले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या या मैदानात मनसेने आपले इंजिन न उतरवता भाजप व त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात प्रचाराची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मनसेच्या  फॉलोअर्सची मते आघाडीच्या उमेदवाराकडे वळणार असल्याचे चित्र तुर्तास तरी दिसते.


बुलडाणा विधानसभेत होती दुसºया क्रमांकाची मते
बुलडाणा जिल्ह्यामध्ये मनसेला फारसा जनाधार नसला तरी बुलडाणा विधानसभेत गतवेळी दुसºया क्रमांकाची मते मनसेने घेतली होती. तर मनसेचे फॉलोअर्स जिल्ह्यात आहेत. त्याचाही फायदा होऊ शकतो.  युवा वर्गाला राज ठाकरे यांचे आकर्षण आहे. त्यामुळे हा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे काही प्रमाणात झुकू शकतो. मात्र ही बाब शिवसेना उमेदवारासाठी चिंतेची आहे. मनसेला जिल्ह्यातील इतर निवडणुकांमध्ये पाहिजे तसे प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. जिल्ह्यातील नगर पालिका, जिल्हा परिषद यासारख्या निवडणुकात मनसे उतरत नसली तरी इतर पक्षाला साथ देऊन बळ देण्याचे काम मात्र निश्चितच होते. 

‘जोश आणि होश’
‘जोश आणि होश’ या दोन्ही पातळीवर मनसेसाठी बुलडाणा जिल्ह्यात भरीव काही करण्यासारखे अद्यापही बाकी आहे. ‘जोश’ असलेले अनेक कार्यकर्ते राज ठाकरेंच्या मागे आहेत. सहा महिन्यापूर्वी जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या दौºयाने युवकांचा जोश दाखवूनही दिला आहे. 

बुलडाण्याच्या दौºयानंतर झाला होता शरद पवारांसोबत एकत्रीत प्रवास
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहा महिन्यापूर्वी बुलडाणा जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकाच विमानातून प्रवास केला. हे दोन्ही नेते एकमेकांच्या बाजूला बसून चर्चा करीत असल्याचे दिसत होते. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली यावर बरेच गुºहाळ चालले. बुलडाणा जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील परिस्थिती सुद्धा शरद पवार यांच्यासमोर मांडली असू शकते. या प्रवासातून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यातील जवळीक स्पष्ट झाली होती.

Web Title: MNS 'engine' on the road of NCP in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.