मनसेचे न.प. समोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:46 AM2017-09-26T00:46:46+5:302017-09-26T00:46:54+5:30
चिखली : शहरात विशेष रस्ता निधी, दलित वस्ती निधी तसेच नगरोत्थान योजनेंतर्गत होत असलेल्या रस्ते व नाल्याची कामे तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या शौचालयाची कामे निकृष्ट दर्जाची होत असताना याबाबत वारंवार निवेदने देऊनही पालिका प्रशासन हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मनसेच्यावतीने नगर पालिकेसमोर २५ सप्टेंबर रोजी ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहरात होत असलेल्या रस्ते, नाल्या व शौचालयांसह इतर सर्व कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून, सदर कामे निविदे प्रमाणे व कामाच्या इस्टीमेटनुसार होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच या कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने या कामांची व बांधकाम विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराची समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे गत ११ ऑगस्ट २0१७ रोजी केली होती; मात्र या निवेदनाला जिल्हा प्रशासनाने केराची टोपली दा खविल्याने जिल्हा प्रशासन बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत मनसेच्यावतीने या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, या मागणीसाठी २५ सप्टेंबर रोजी नगर परिषद कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, राजेश परिहार यांच्या नेतृ त्वात हे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनासह पालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावेळी रवी वानखेडे, राधेश्याम कुलकर्णी, गजानन दांडगे, अजय देशमाने, सिद्धू रिन्ढे, बाळु नेवरे, बाबा खान, अंकुश सुसर, समाधान म्हस्के, अमोल गादे, दीपक देशमुख, वैभव देहाडराय, विशाल इंगळे, मोहन मेहेत्ने, किशोर लोखंडे, गणेश मानतकर, विकास राऊत, दीपक वानखेडे, मंगेश उगले, विजय इंगळे, गणेश राऊत, दीपक बरबडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, येत्या १0 दिवसांत चौकशी समिती स्थापन न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी प्रशासनास दिला.