साखरखेर्डा पोलिस ठाण्यासमोर जमावाचा गोंधळ, शेख आदिल हत्याप्रकरण: जमावातील २१ जणांवर गुन्हे
By निलेश जोशी | Published: April 15, 2023 06:18 PM2023-04-15T18:18:28+5:302023-04-15T18:19:45+5:30
गवंडी कामगार शेख आदिल याच्या हत्येप्रकरणी उर्वरित दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात जमलेल्या जमावाने काहीसा गोंधळ केला.
साखरखेर्डा: येथील गवंडी कामगार शेख आदिल याच्या हत्येप्रकरणी उर्वरित दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात जमलेल्या जमावाने काहीसा गोंधळ केला. याच दरम्यान हत्या प्रकरणातील आरोपीने नैसर्गिक विधीच्या निमित्त साधून पोलिस कोठडीतून पलयान करण्याचा प्रयत्न केल्याने १४ एप्रिल रोजी पोलिस ठाण्याच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
प्रकरणी पोलिसांनी बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी २१ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.साखरखेर्डा येथील जाफ्राबादपुऱ्यातील शेख आदिल याचा आर्थिक वादातून आरोपी प्रशांत योगेंद्र गवई याने गळा आवळून खून केला होता. या प्रकरणात पोलिसांनी १३ एप्रिल रोजीच आरोपी प्रशांत गवईस अटक केली होती. मात्र याप्रकरणात गोकूळ प्रताप कामे, हन्नानशहा या दोषींवरही कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन देण्यासाठी एक जमाव रात्री पोलिस ठाण्यात गेला होता. यावेळी काहींनी नारेबारीकरत गोंधळही केला.
हा घटनाक्रम घडत असतानाच दुसरीकडे गावामध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली होती. त्यामुळे पोलिस ठाण्यात केवळ चारच पोलिस होते. यावेळी पोलिसांनी व गावातील राजकीय व्यक्तांनी जमावास शांत करण्याचे प्रयत्नही व्यर्थ गेले होते. त्यामुळे राज्य राखीव पोलिस दलाच्या पथकाने बळाचा वापर करून जमावास पांगविले. प्रकरणी बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. यात शेख अजगर शेख अफसर, साजीतखान सलीम खान, शेख समीर शेख शफी, अजहर शेख हनीफ, शेख सिकंदर शेख रफीक, साबीर हुसेन, अजीम खान शरीफ खान, मोहम्मद रफीक मोहम्मद शफी, शेख अर्शद शेख अफसरसह अन्य अशा २१ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
साखरखेर्डा गावाला छावणीचे स्वरुप
परिस्थितीचे गांभिर्य पहता जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, एसडीपीअेा विलास यामावार, मेहकर, अंढेरा, बिबी, अमडापूर, बुलढाणा आमि जानेफळ येथील पोलिसांची कुमक आमि राज्य राखीव पोलिस दलही साखरखेर्डा येथे दाखल झाहोते. त्यामुळे संपूर्ण गावाला छावणीचे स्वरुप आले होत.
होता गड्डा म्हणून पकडला गेला आरोपी
उपरोक्त घटनाक्रमादरम्यान नैसर्गिक विधीचे निमित्त करून पोलिस कोठडीतील खूनाच्या प्रकरणातील आरोपीने सोबतच्या पोलिसाच्या हाताला झटका देत पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री वीज पुरवठा सारखा खंडीत होत असल्याने तथा लगतच नवीन पोलिस ठाण्याचे काम करण्यात येत असल्याने अंधारात आरोपीस समोरील खड्डा न दिसल्याने तो त्यात पडला. त्याच्या पाठोपाठ दोन पोलिसांनही लगेच खड्ड्यात उड्या मारून आरोपी प्रशांत गवईस पकडले. या घटनाक्रमात तिघेही जखमी झाले. आरोपीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर पोलिस कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.