भिकेच्या पैशातून ग्रामपंचायत सचिवाला मोबाईल भेट;  भारिप-बमसंचे भिक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 05:38 PM2018-03-21T17:38:07+5:302018-03-21T17:38:07+5:30

मलकापूर :  तालुक्यातील मौजे वाकोडी येथे भारिप-बमसंच्यावतीने  बुधवारी भिक मांगो आंदोलन करण्यात आले. सतत संपर्काबाहेर राहणाऱ्या ग्रामपंचायतच्या सचिवाला भिकेच्या पैशातून मोबाईल खरेदी करून गटविकास अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.

mobile phone given to grampanchayat secretary by bharip-bms | भिकेच्या पैशातून ग्रामपंचायत सचिवाला मोबाईल भेट;  भारिप-बमसंचे भिक मांगो आंदोलन

भिकेच्या पैशातून ग्रामपंचायत सचिवाला मोबाईल भेट;  भारिप-बमसंचे भिक मांगो आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्दे  वाकोडी ग्रामपंचायतीचे सचिव पी.डी. खर्चे यांचा संपर्क होत नाही.भिकेच्या पैशातून जमा रकमेतून मोबाईल खरेदी करण्यात आला.तो सचिवास देण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ.एस.टी. चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

मलकापूर :  तालुक्यातील मौजे वाकोडी येथे भारिप-बमसंच्यावतीने  बुधवारी भिक मांगो आंदोलन करण्यात आले. सतत संपर्काबाहेर राहणाऱ्या ग्रामपंचायतच्या सचिवाला भिकेच्या पैशातून मोबाईल खरेदी करून गटविकास अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.
  वाकोडी ग्रामपंचायतीचे सचिव पी.डी. खर्चे यांचा संपर्क होत नाही. या कारणावरून भारिप-बमसंच्यावतीने तालुका उपाध्यक्ष योगेश काजळे ह्यांच्या नेतृत्वात भिक मांगो आंदोलन करण्यात आले. भिकेच्या पैशातून जमा रकमेतून मोबाईल खरेदी करण्यात आला व तो सचिवास देण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ.एस.टी. चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.
या आंदोलनात गंगाधर तायडे, सतिश काजळे, अक्षय तायडे, विशाल तायडे, जितु तायडे, अमोल तायडे, सागर इंगळे, रूतीक केला, आकाश वानखेडे आदींसह अनेकजण सामील होते. या आंदोलनामुळे वाकोडी गावात एकच खळबळ उडाली.  

 
मी काय खरेदी करायच काय नाही हा माझा प्रश्न आहे. माझ्याकडे दोन गावांचा चार्ज आहे. मी माझ काम बरोबर करतो माझ्या जीवनात वैयक्तिक समस्या इतक्या आहेत की त्याचा विचार बाहेरचे करतील की मी करायचा तुम्हीच सांगावे.
- पी.डी. खर्चे, ग्रामसेवक तथा सचिव ग्रा.पं. वाकोडी.

Web Title: mobile phone given to grampanchayat secretary by bharip-bms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.