डोणगाव येथे मोबाइलचे दुकान फोडून २0 हजारांचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:23 AM2018-02-13T01:23:54+5:302018-02-13T01:24:48+5:30
डोणगाव : परिसरात ११ फेब्रुवारीला गारपिटीमुळे व वार्यामुळे रात्रभर डोणगाव येथील विद्युत बंद असल्याचा फायदा घेत डोणगाव येथील राज्य महामार्गावर असणारी कैलास मोबाइल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून २0 हजाराचा माल व मोबाइल व्हाऊचर लंपास केल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : परिसरात ११ फेब्रुवारीला गारपिटीमुळे व वार्यामुळे रात्रभर डोणगाव येथील विद्युत बंद असल्याचा फायदा घेत डोणगाव येथील राज्य महामार्गावर असणारी कैलास मोबाइल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून २0 हजाराचा माल व मोबाइल व्हाऊचर लंपास केल्याची घटना घडली.
डोणगाव येथे राज्य महामार्गालगत कैलास बोडखे यांचे कैलास मोबाइलचे दुकान असून, ११ फेब्रुवारीला रात्री दुकान बंद करून ते घरी गेले व रात्रभर डोणगावचा विद्युत पुरवठा बंद असल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेत ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दरम्यान बोडखे यांच्या मोबाइलच्या दुकानावरील पत्रा कापून चोरट्याने आत प्रवेश करून दुकानात असलेले मोबाइल व व्हाऊचर अंदाजे २0 हजार ४00 रुपयांचे चोरून नेले. सदर घटना १२ फेब्रुवारी रोजी सकाळी दुकान उघडल्यानंतर लक्षात आली. या अगोदरही चोरट्यांनी हेच मोबाइल दुकान फोडून चोरी केली होती. कैलास बोडखे यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकाँ अरूण खनपटे, काकड, विष्णू जायभाये करीत आहेत.
मोताळा : चोरट्यांनी किराणा दुकान फोडले!
तालुक्यातील तालखेड येथे अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री किराणा दुकान फोडून २६ हजार रुपये नगदी तर शेलापूर येथील एक दुचाकी लंपास केली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मधुकर वामन चोपडे रा. तालखेड यांचे गावात घर असून, घरालगतच किराणा दुकान आहे. रविवारी रात्री दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानातील नगदी २६ हजारांची रक्कम लंपास केली. चोपडे कुटुंबियांना या प्रकाराची भनक लागताच त्यांनी आरडाओरड केल्यामुळे चोरट्यांनी शेतशिवाराकडे पळ काढला. दरम्यान, याच रात्री शेलापूर येथील प्रवीण सुखदेव आमटे यांच्या घरासमोर उभी असलेली होंडा टीव्हीएस स्टार दुचाकी (क्रमांक एम.एच. २८ वाय. 0५३७) चोरट्यांनी लंपास केली.