अमरावतीमधील मोबाईल चोरट्यास अटक; चार मोबाईलस दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 05:47 PM2018-11-09T17:47:41+5:302018-11-09T17:48:15+5:30
किनगाव राजा: सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमरावतीमधील मोबाईल चोरट्यास अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईलसह एक दुचाकी जप्त केली आहे.
किनगाव राजा: सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमरावतीमधील मोबाईल चोरट्यास अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईलसह एक दुचाकी जप्त केली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातही मोबाईल व दुचाकीची चोरी त्याने केली असण्याची शक्यता असून पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत. ८ नोव्हेंबरला किनगाव राजा पोलिसांनी ही कारवाई केली. नरेंद्र प्रवीण अव्हाड (२९, वरूड, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आठ नोव्हेंबरला पिंपळगाव लेंडी फाट्याजवळ एका व्यक्तीचा मोबाईल चाकूच्या धाकावर हिसकावून घेत ऐकाने पलायन केल्याची माहिती किनगाव राजा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी नाकाबंदी करून नरेंद्र आव्हाड यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चार मोबाईल, १४ इंचाचा चाकू व दुचाकी पोलिसांनी त्याच्याकडून ताब्यात घेतली. चौकशीमध्ये त्याने आणखी तीन मोबाईल जालना येथून चोरून आणले असल्याचे सांगितले. एमएच-१५-एजे-१०७८ क्रमांकाची दुचाकीही त्याने नाशिक येथून चोरून आणली असल्याचे पोलिस तापासात सांगितले. दरम्यान, त्याने जालन्यासह अन्य कोठे कोठे चोर्या केल्या याचा तपास सध्या किनगाव राजा पोलिस करीत असून त्याच्याकडून आणि चोरीचे मोबाईल, दुचाकी व अन्य काही मुद्देमाल जप्त होण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी व्यक्त केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्धन शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक किशोर शेरकी, पोलिस हेडकॉन्स्टेबल शेषराव सरकटे, विनायक मोरे, श्रावण डोंगरे, विनोदसिंग राजपूत व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.