टाटा टेली सर्व्हिसेसचे मोबाइल टॉवर सील!

By admin | Published: March 16, 2017 03:09 AM2017-03-16T03:09:52+5:302017-03-16T03:09:52+5:30

चिखली नगर परिषदेमार्फत विशेष करवसुली अभियान; थकीत कर न भरणा-यांवर कारवाईचा बडगा

Mobile tower seal of Tata Teleservices! | टाटा टेली सर्व्हिसेसचे मोबाइल टॉवर सील!

टाटा टेली सर्व्हिसेसचे मोबाइल टॉवर सील!

Next

चिखली(जि. बुलडाणा), दि. १५- चिखली नगर परिषदेमार्फत विशेष करवसुली अभियान राबविण्यात येत असून, वारंवार सुचित करूनही थकीत कर न भरणार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. या अं तर्गत सन २0१४ ते २0१७ पर्यंत १ लाख २४ हजार ७४0 रुपयांचा कर थकविल्याप्रकरणी पालिकेने आज धडक कारवाई करीत पालिका हद्दीतील टाटा टेली सर्व्हिसेसच्या मोबाइल टॉवरला सील ठोकले आहे.
राज्यातील नगर परिषदा, नगर पंचायती या आर्थिकदृष्ट्या सक्षम असाव्यात, या हेतूने येत्या ३१ मार्चपर्यंंत पालिकांनी ह्यविशेष वसुली मोहीमह्ण राबवून १00 टक्के करवसुली करावी, असे फर्मान राज्याच्या नगर विकास विभागाने बुधवारी काढले आहेत. या धर्तीवर चिखली पालिकेने करवसुलीसाठी कंबर कसली असून, या मोहिमेंतर्गत शहरातील ७0 टक्के थकबाकीदार करदात्यांकडून सुमारे ५ कोटी रुपयांच्या कराची वसुली करण्यासाठी मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या नेतृत्वात विशेष करवसुली अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत थकीत करदात्यांना यापूर्वी वारंवार सुचित करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून कर वसुली विभागाद्वारे आता धडक कारवाई केली जात आहे. या अंतर्गत १५ मार्च रोजी स्थानिक वार्ड क्र.७, मालमत्ता क्रमांक २00१ मधील भूषण डागा यांच्या मालकीच्या जागेत उभारण्यात आलेल्या टाटा टेली सर्व्हिसेस, वरळी मुंबई या कं पनीच्या मोबाइल टॉवरचे सन २0१४ ते २0१७ पर्यंंत १ लाख २४ हजार ७४0 रुपयांचा कर थकीत असल्याने सदर मोबाइल टॉवरला सील ठोकण्याची कारवाई कर वसुली पथकाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Mobile tower seal of Tata Teleservices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.