बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श
By admin | Published: October 30, 2014 11:02 PM2014-10-30T23:02:24+5:302014-10-30T23:35:15+5:30
अतिशय संवेदनशील असलेल्या मंदिर-मशीद अशा पवित्र स्थळांवर धार्मिक एकात्मता.
बुलडाणा : ३१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्याचा आढावा घे तला असता, एकात्मतेचे मूर्तिमंत आदर्श उदाहरण समोर आले आहे. धार्मिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या मंदिर-मशीद अशा पवित्र स्थळांवर धार्मिक एकात्मता गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्याची येथील परंपरा आहे, ही बाब जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद व गौरवास्पद आहे. अशाच सौहार्दपुर्ण बुलडाणा जिल्ह्यातील दुर्लक्षित भागांचा मागोवा
भोनमध्ये मुस्लिमेतरांचा मोहरम
संग्रामपूर तालुक्याच्या दुर्गम भागात व पूर्णेच्या काठावर वसलेले भोन या गावाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. भोनमध्ये मुस्लिम समाजाचे एकही घर नसताना दरवर्षी मोहरमच्या दिवशी लवलाटबाबाची पालखी (सवारी) निघते. मुस्लिमेतर लोकच ही सवारी सजवितात. या सवारीचे नेतृत्व गावातील भोई समाजाकडे असते. दरवर्षी मोहर्रमच्या दिवशी हजारो भाविक भक्ताचे पाय भोनकडे आपसूकच वळू लागतात.
जयपूरमध्ये एकत्र नांदतात ह्यराम आणि रहिमह्ण
मोताळा तालुक्यातील जयपूर या तीन हजार लोकवस्तीच्या गावाने हिंदू-मुस्लिम एकतेचे आगळेवेगळे उदाहरण देत ह्यराम आणि रहिमह्ण गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात, हे गेल्या ५५ वर्षांपासून दाखवून दिले आहे. जयपूर गावातील हनुमान मंदिर व मशीद हे जवळ जवळ असूनही कधी भेदाभेदाची स्थिती निर्माण झाली नाही. विशेष म्हणजे, रमजानात या ठिकाणी हिंदू बांधवांकडून उपवास (रोजे) ठेवले जातात.
देऊळगावमहीत मंदिर-मशीद घडवताहेत एकतेचे दर्शन!
देऊळगांवमही येथे शेजारी-शेजारी असलेले महादेव मंदिर, गणपती मंदिर व मशीद हिंदू-मुस्लिम समाजामध्ये एकोपा निर्माण करणारे ठरले आहे. दोन समुदायांतील हे ऐक्य मंदिर-मशिजीमुळेच शक्य झाले असून, येथील नागरिकांनी जा तीय सलोखा आणि भाईचारा कायम ठेवल्याने भांडणतंट्यांना जागाच उरली नाही. दोन्ही धार्मिक स्थळांची भिंत एकच असून, या भिंतीला अविश्वासाचा तडा कोणीच जाऊ दिला नाही.
शहापूर येथील निपाणीबाबांचा ऐतिहासिक दर्गा
खामगाव : बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या शहापूर या गावाला पुरातन इतिहास लाभला आहे. मन, तोरणा व उतावळी या तीन नद्यांचा संगम येथे होतो. येथील निपाणीबाबा यांच्या दग्र्यावर दरवर्षी हिंदू-मुस्लिम बांधवांच्या वतीने उर्स (यात्रा) साजरा केला जातो. निपाणीबाबांचा हा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनला आहे. इ.स. १६00 ते १७00 दरम्यान औरंगजेबाचा पुत्र मुराद याचे राज्य या परिसरात होते. राजपुत्र मुराद हा शहापूर निवासी असताना त्याने आपले राज्य वाढविण्यासाठी शहापूर-दस्तापूर-कदमापूर या मार्गे बाळापूर येथील किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला होता. उर्सच्या अगोदरच्या रात्री बाबांचा संदल काढला जातो. भाविकांची येथे दर्शनासाठी वर्दळ असते.