शेतकर्‍यांना न्याय न देणारे मोदी खोटारडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:54 AM2017-08-15T01:54:31+5:302017-08-15T01:55:09+5:30

बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला.

Modi is not giving justice to farmers lie! | शेतकर्‍यांना न्याय न देणारे मोदी खोटारडे!

शेतकर्‍यांना न्याय न देणारे मोदी खोटारडे!

Next
ठळक मुद्देखासदार राजू शेट्टी यांचा आरोपदेशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला.
 येथील पत्रकार भवनात १४ ऑगस्ट रोजी आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना खा. शेट्टी  म्हणाले, की लोकसभा निवडणूक काळात एनडीएचे  उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध  आश्‍वासने दिली. 
यावेळी शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव  देण्यात येईल, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी  करण्यात येईल आदी आश्‍वासनांचा त्यात समावेश होता.  मात्र निवडणुकीनंतर त्यांनी शेतकर्‍यांना कोणत्याच  प्रकारचा न्याय दिला नाही. देशात दाळवर्गीय उत्पादन  वाढले असताना परदेशातून डाळ आयात करण्यात आली.  या धोरणामुळे शेतकर्‍यांना बाजार भाव मिळाला नाही.  राज्यातही शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन  देण्यात आले होते. मात्र कर्जमाफी करताना विविध अटी  लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकर्‍यांना  न्याय मिळाला नाही. 
यावर्षी पाऊस नसल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यावर  दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  दिलास द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्या  सरकार दरबारी मांडाव्यात यासाठी विदर्भाचा दौरा आयोजि त केला आहे. यावेळी कर्जमाफीच्या अटी मान्य नाहीत. 
शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करून न्याय  द्यावा, या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे  खासदार शेट्टी यांनी सांगितले. यावेळी वस्त्रोद्योग  महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, राज्य प्रवक्ते प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, गजानन पाटील बंगाळे, मयूर बोर्डे आदी उ पस्थित होते. 

देशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांना देशव्यापी स्तरावर न्याय  मिळण्यासाठी अखील भारतीय किसान समन्वय समितीच्या  माध्यमातून देशातील विविध भागातील १६0 शेतकर्‍यांच्या  संघटना एकत्र येणार आहेत. येणार्‍या हिवाळी  अधिवेशनादरम्यान अखील भारतीय किसान समन्वय समि तीच्या माध्यमातून १0 लाख शेतकरी एकत्र येणार आहेत.  अशा चळवळीच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येणे  आवश्यक असल्याचेही खा. राजू शेट्टी यांनी सांगि तले.याचवेळी राज्यातील सत्तेत सहभाग ही केवळ औ पचारिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Modi is not giving justice to farmers lie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.