सुधारीत-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:13+5:302021-01-21T04:31:13+5:30

मेहकर सत्र न्यायालयाचा निकाल मेहकर (बुलडाणा) : पाेटच्या दिव्यांग मुलीवर सतत अत्याचार करणाऱ्या बापास मेहकर सत्र न्यायालयाने २० जानेवारी ...

Modified- | सुधारीत-

सुधारीत-

googlenewsNext

मेहकर सत्र न्यायालयाचा निकाल

मेहकर (बुलडाणा) : पाेटच्या दिव्यांग मुलीवर सतत अत्याचार करणाऱ्या बापास मेहकर सत्र न्यायालयाने २० जानेवारी राेजी सश्रम आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.

डाेणगाव पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील ४८ वर्षीय नराधम बाप पत्नी, तीन मुली व एका मुलासह पुणे येथे मजुरी करीत हाेता. पुणे येथे असताना त्याच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे ताे आपल्या मुलांना घेऊन गावी आला. गावी आल्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडले. २०१८ मध्ये महाशिवरात्रीच्या दाेन दिवस आधी घरातील सर्व जण झाेपलेले असताना नराधम बापाने दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी पीडित मुलीने ही बाब लहान बहिणीला सांगितली. मात्र, वडील मारून टाकतील म्हणून काेणालाच सांगितले नाही. २० सप्टेंबरच्या रात्रीसुद्धा नराधम बापाने पीडित मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलगी व तिच्या बहिणीने आरडाओरड केल्याने नराधम बाप निघून गेला. २१ सप्टेंबर राेजी पीडित मुलीने आपल्या काका व काकूला सर्व प्रकार सांगितला. तसेच काकाबराेबर डाेणगाव पाेलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. या प्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी आराेपी नराधम बापाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दखल केला हाेता. या गुन्ह्याचा तपास पाेलीस उपनिरीक्षक व्ही. डी. मुडे यांनी करून मेहकर सत्र न्यायालयात दाेषााराेपपत्र दाखल केले. या प्रकरणात पीडित मुलीच्या बहिणीसह एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. अतिरिक्त सरकारी अभियाेक्ता जे. एम. बाेदडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. खाेंगल यांनी २० जानेवारी राेजी आराेपी बापास सश्रम आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला असून दंड न भरल्यास पुन्हा दाेन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

Web Title: Modified-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.