वरवट बकाल येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:34 AM2017-11-27T01:34:13+5:302017-11-27T01:39:59+5:30
१५ वर्षीय विद्यार्थीनी सकाळी ६ वाजेदरम्यान ट्युशनला जात असताना दुचाकी चालक व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने तिचा विनयभंग केल्याची घटना वरवट बकाल येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : १५ वर्षीय विद्यार्थीनी सकाळी ६ वाजेदरम्यान ट्युशनला जात असताना दुचाकी चालक व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने तिचा विनयभंग केल्याची घटना वरवट बकाल येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी तामगाव पोलीसांनी दोन युवकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
वरवट बकाल येथील १५ वर्षीय विद्यार्थीनी सकाळी ६ वाजेदरम्यान ट्युशनला जात असताना गावातीलच सचिन अवताडे व अविनाश इंगळे या दोघांनी दुचाकी घेऊन या मुलीचा पाठलाग केला. तसेच दुचाकीवर बसलेला अविनाश इंगळे याने वाईट उद्देशाने तिच्या अंगावरील ओढणी हिसकावून मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले. ही बाब संबंधित मुलीने आपल्या आई-वडीलांना ट्युशनवरुन घरी परतल्यानंतर सांगितली. त्यामुळे पीडित मुलीच्या आईवडीलांनी तामगाव पोलिस स्टेशन गाठत या घटनेची तक्रार तामगाव पोलिसात दिली. सदर तक्रारीवरुन पोलीसांनी सचिन अवताडे व अविनाश इंगळे या दोघांविरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) ३५४ (ड) सहकलम १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम सहकलम ३ (१) (डब्ल्यू) (आय) (२) अ.जा.ज.अ.प्र. कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.