घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; दिरालाही मारहाण
By सदानंद सिरसाट | Updated: October 6, 2023 18:57 IST2023-10-06T18:57:12+5:302023-10-06T18:57:41+5:30
याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गावातील आरोपी लहानू संपत वारे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; दिरालाही मारहाण
खामगाव : घरासमोर शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस हटकले असता त्याने घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गावातील आरोपी लहानू संपत वारे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तिच्या घरासमाेर शिवीगाळ करीत होता. त्याला हटकले असता आरोपीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. आरडाओरड केल्याने महिलेचा दीर तेथे आला, त्याने आरोपीस विचारणा केली असता आरोपीने दिरालाही शिवीगाळ करीत लाकडी फळी मारून जखमी केले. तसेच काय होते ते करून घ्या, असे म्हटले. महिलेचा पती आला असता आरोपी पळून गेला. पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ), ४५२, ३२४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.