पैसे आणि दादागिरीने सत्ता मिळत नाही : तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 02:37 PM2019-04-01T14:37:25+5:302019-04-01T14:37:45+5:30

सर्वसामान्यांनी राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमदेवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पाठबळ देऊन या संधीचे सोने करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.

 Money and bullying do not get power: Tupkar | पैसे आणि दादागिरीने सत्ता मिळत नाही : तुपकर

पैसे आणि दादागिरीने सत्ता मिळत नाही : तुपकर

Next

बुलडाणा : केवळ पैसे किंवा दादागिरीने सत्ता मिळवता येत नाही. असे असते तर या देशात करोडपती उद्योजकांचे किंवा माफीयांचेच राज्य असते. कोणी केवळ पैसे किंवा दादागिरीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना सर्वसामान्यांनी लोकशाहीची ताकद दाखविली पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने आता बुलडाण्यात परिवर्तनाची संधी चालून आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांनी राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमदेवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पाठबळ देऊन या संधीचे सोने करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.
राष्टÑवादी काँग्रेस आघाडीतील नेत्यांनी ३० मार्च रोजी मेहकर तालुक्यात प्रचार दौरा केला. यावेळी जानेफळ येथे सभा पार पडली. यासभेत तुपकर बोलत होते. मंचावर उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, नगराध्यक्ष कासम गवळी, साहेबराव सरदार, युनायटेड रिपिब्लकन पार्टीचे नितीन मोरे, अनंतकुमार वानखेडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष देवानंद पवार, राष्ट्रवादीचे संतोष चांदणे यांच्यासह आघाडीतील मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
तुपकर म्हणाले की, भाजपा सरकारने दीडपट हमीभाव आणि कर्जमुक्तीचा शब्द दिला होता; परंतू त्यांनी तो शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही. याउलट आघाडीने शेतकरी हिताचे निर्णय घेण्याबाब आश्वासन दिल्याने स्वाभिमानी आघाडी सोबत आहे. डॉ.शिंगणेंनी स्वत: कोणतीही संस्था, शाळा न घेता कार्यकर्त्यांना दिल्या. कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले तर त्यांच्या विरोधातील उमेदवाराने मात्र सगळ्या संस्थांची पदे आपल्याच घरात ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे तर स्व.दिलीपराव रहाटे यांच्यासह स्व.किशोरबापू देशमुख, स्व.बंडू पाटील मापारी, स्व.दामूअण लोढे या जुन्या शिवसैनिकांच्या भरवश्यावर नेते झाले आणि आता त्यांच्या कुटुंबियांना वाºयावर सोडले. या शिवसैनिकांच्या वारसांना त्यांनी काय दिले, असा प्रश्न तुपकरांनी भाषणात उपस्थित केला.
यावेळी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आरोग्य मंत्री असताना जिल्ह्यातील दवाखाने सुसज्ज करण्याचे कामे. आरोग्यविषयक विविध सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या.
खडकपूर्णा प्रकल्प मार्गी लावले असा दावा करीत खासदारांनी दहा वर्षांत कोणते मोठे काम केले ते सांगावे असे आव्हान प्रतापराव जाधव यांना दिले. सभेत श्याम उमाळकर, नितीन मोरे, कासम गवळी, लक्ष्मण घुमरे, अनंता वानखेडे यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवसेनेकडून तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या गंगुबाई पाटील यांचे पती किसन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

Web Title:  Money and bullying do not get power: Tupkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.