पैसा झाला खोटा; वैध असूनही दहा रुपयांचे नाणे चालेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:27+5:302021-09-22T04:38:27+5:30
सामान्यांसमोर उभा ठाकला आहे. कुठल्याच नाण्यावर बंदी नाही रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये १० रुपयांची नाणी चलनात आणली. सध्या १४ ...
सामान्यांसमोर उभा ठाकला आहे.
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये १० रुपयांची नाणी चलनात आणली. सध्या १४ प्रकारची नाणी चलनात असून त्यापैकी कुठल्याच नाण्यावर अद्याप बंदी लादण्यात आलेली नाही, असे ‘आरबीआय’ने यापूर्वी अनेकवेळा स्पष्ट करून नागरिकांच्या मोबाईलवर यासंदर्भात जनजागृतीपर संदेशही पाठविले आहेत.
कोणती नाणी नाकारतात
जिल्ह्यातील व्यापारपेठांमधील बहुतांश व्यावसायिकांकडून १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिला जात
आहे. काही पेट्रोल पंपावर १० रुपयांचे एक ते दोन नाणे असले तर घेतले जाते परंतु त्यापेक्षा जास्त असले तर १० रुपयांच्या नाण्याला पेट्रोलपंपावरही नकार दिला जात असल्याची माहिती आहे.
बँकांमध्ये नाण्यांचा मोठा साठा
१. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास सपशेल नकार दिला जात आहे, बँकांमध्ये मात्र दहा रुपयांची नाणी स्वीकारली जातात. त्यामुळे बँकांमध्येही दहा रुपयांच्या नाण्यांचा मोठा साठा आहे.
२. मोठ्या प्रमाणात नाणी जमा करावयाची असल्यास ती कुठून आली याचे कारणही बँकेत सादर करावे लागते.
व्यापाऱ्यांनी सर्वच नाणे स्वीकारावे..
कुठल्याही नाण्यांना बंदी नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सर्वच नाणे स्वीकारावे. विशेषत: दहा रुपयांच्या नाण्यांचा प्रश्न आहे; परंतु दहा रुपयांचे नाणेही बंद करण्यात आलेले नाही.
नरेश हेडाऊ, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, बुलडाणा.
पैसा असून अडचण
माझ्याकडे दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात आहेत. भारतीय चलन असल्याने मी ही नाणी स्वीकारली, परंतु आता कोणताही दुकानदार या नाण्यांमध्ये व्यवहारच करत नाही, त्यामुळे पैसा असूनही अडचण निर्माण झाली आहे.
- गजानन चव्हाण.
दहा रुपयांची नाणी नाकारणे हा चलनाचा अवमान आहे. बाजारात ही नाणी कोणीच स्वीकारत नाही. अनेकदा बँकांमध्येही ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला जातो. सामान्य नागरिकांना आरबीआयच्या दिशानिर्देशांबाबत माहिती नसते.
- रुपेश जगताप.