धन तेरस नव्हे; ‘ध्यान तेरस’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:32 AM2017-10-17T00:32:14+5:302017-10-17T00:32:40+5:30
दिगंबर जैन, संप्रदायात धन तेरसला ‘ध्यान तेरस’ म्हटले गेले आहे. याच दिवशी अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी योग विरोध केला होता तो पर्यंत तीर्थंकर केवलीचे विचरण होत होते तीर्थंकरांच्या भ्रमण काळात त्यांच्या इच्छेनुरुप क्रिया होत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा : दिगंबर जैन, संप्रदायात धन तेरसला ‘ध्यान तेरस’ म्हटले गेले आहे. याच दिवशी अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी योग विरोध केला होता तो पर्यंत तीर्थंकर केवलीचे विचरण होत होते तीर्थंकरांच्या भ्रमण काळात त्यांच्या इच्छेनुरुप क्रिया होत असतात. धनत्रयोदशीला भगवान महावीर निर्वाण मार्गाकडे ध्यानस्थ होत चालले ते तृतीय शुक्ल पक्षात लीन झाले म्हणजे त्यांचे अवतारकार्य अंतर्धान पावले म्हणून या दिवसाला ध्यान तेरस म्हणतात, असे प्रतिपादन जैन मुनी o्रमणमुनी विशेषसागरजी यांनी धर्म सभेला संबोधित करताना १६ ऑक्टोबर रोजी केले.
मनुष्य संसार, जीव, माया, मोह, ममता यात गुरफटलेला आहे. त्यामुळे धनवान व्यक्ती धनाची पूजा करतात. दुकान, फर्म, घर याची सजावट करून नवीन वस्त्र, भांडी, अलंकार यांची खरेदी करण्याचे प्रयोजन याच शुभदिनी केले जाते. भगवान महावीर स्वामी संदेशात म्हणतात, ‘आजचा दिवस संग्रहाचा नाही, विग्रहाचा आहे.’ भगवान महावीर यांचा विरोध झाल्याबरोबर बहिरंग लक्ष्मीचीदेखील बिदाई होते. म्हणून या पर्वाला ध्यान तेरस हे संबोधन केले गेले आहे. धनाची पूजा करणारे जीव धनाला प्राण मानतात. आचार्य भगवान म्हणतात, ‘लक्ष्मी धन जोडून तनाची पूजा करून येत नसते, ती येते फक्त पूर्व पुण्याईने व सत्कर्माने.’ जैन भगवान कार्नीकेस स्वामी यांच्या मते देव, लक्ष्मी, पैसा पूजन करून कार्यसिद्धी होते, असे मानले तर कर्मसिद्धांत निष्फळ व व्यर्थ होईल.