बँक अधिकाऱ्यांचा बनाव करून खात्यातून उडवतात पैसे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:11 PM2020-11-29T12:11:52+5:302020-11-29T12:11:59+5:30

Cyber Crime News ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगण्यात येते.

Money is stolen from the account by pretending to be bank officials! | बँक अधिकाऱ्यांचा बनाव करून खात्यातून उडवतात पैसे! 

बँक अधिकाऱ्यांचा बनाव करून खात्यातून उडवतात पैसे! 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बँकेतून बोलत असल्याचे सांगत मोबाइलवरील ओटीपी क्रमांक मागून अनेकांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. या प्रकाराच्या तक्रारी  बुलडाणा सायबर सेलकडे करण्यात आल्या आहेत. तातडीने आलेल्या तक्रारींवर पोलिसांनी  सूत्रे हलविल्यानंतर पैसे परत आणण्यात यश आले आहेत; मात्र काही प्रकरणात तक्रारकर्त्यांनी दिरंगाइ केल्याने असे , पैसे परत आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले.   ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगण्यात येते. खूप दिवसांपासून पासवर्ड बदलला , नसल्याचे सांगत पासवर्ड बदलण्याच्या नावाखाली त्यांच्या मोबाइलवर आलेला   ओटीपी मागून बँक खात्यातील रक्‍कम , पळविल्याचे समोर आले आहे.  तर काही प्रकरणात मेसेंजरवर  मित्राचे खाते हॅक करून त्यामधून पैसे , मागून फसवणूक करण्यात आली . त्यानंतर विदेशातून गिफ्ट आल्याचे सांगत त्याची कस्टम ड्युटीचे शुल्क , भरण्याच्या नावाखाली अनेकांना   फसविल्याचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. 

३३ लाखांची फसवणुक 
जिल्ह्यात जानेवारी ते  ऑक्टाेबर दरम्यान २८ जणांची  ऑनलाइन फसवणुक करण्यात आली आहे. नागरिकांची जवळपास ३३ लाख रुपयांनी  फसवणुक करण्यात आली आहे. परराज्यातील भामट्यांनी सर्वाधीक फसवणुक केली आहे. आमिषाला बळी पडल्यामुळे फसवणूक हाेत आहे. 
विविध आमीषे दाखवून लाेकांची आऑनलाइन फसवणुक करण्यात येत आहे.

बॅंकेतून कुणीही एटीएमविषयी माहिती मागत नाही. तसेच परराज्यातून आलेल्या मॅसेजला नागरिकांनी प्रतिसाद देउन नये.फसवणुक झाल्यास तातडतीने सायबर सेल व पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. 
- प्रदीप ठाकूर,ठाणेदार सायबर सेल, बुलडाणा 

Web Title: Money is stolen from the account by pretending to be bank officials!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.