पिसाळलेले माकड वन विभागाच्या ताब्यात!

By admin | Published: March 6, 2017 01:46 AM2017-03-06T01:46:12+5:302017-03-06T01:46:12+5:30

पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर माकडाला पकडण्यात यश आले.

Monsoon Monkey Forest Department! | पिसाळलेले माकड वन विभागाच्या ताब्यात!

पिसाळलेले माकड वन विभागाच्या ताब्यात!

Next

खामगाव, दि. ५- दंडेस्वामी मंदिर, सत्यनारायण मंदिर व गोपाळनगर परिसरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरू होता. याची माहिती वन विभागाला मिळताच, ४ मार्च रोजी सापळा रचून त्याला पकडण्यात यश मिळविले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून दंडेस्वामी मंदिर, सत्यनारायण मंदिर, गोपाळनगर व घाटपुरी नाका परिसरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरू होता. माकडाने अनेक महिला व नागरिकांना चावा घेऊन गंभीर जखमी केले होते; परंतु माकडाला पकडण्यात वन विभागाला यश येत नव्हते. ४ मार्च रोजी वन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सकाळी १0 वाजेपासून सापळा रचला होता व पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर माकडाला पकडण्यात यश आले. वनपरिक्षेत्र अधिकारी साळुंखे, वनपाल गीते व सहकारी तसेच बुलडाणा येथील रेस्क्यू टीमने पाच तास अथक परिश्रम घेऊन माकडास जेरीस आणले व इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून पकडले. या मोहिमेत साळुंखे, वनपाल गीते, वनरक्षक राजू देठे, वाहन चालक मिलिंद जाधव, बावणे, वनरक्षक मांटे, वनपाल वाघ व गोपाळनगर भागातील नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या परिसरातील नागरिकांकडून सर्व चमूचे अभिनंदन होत आहे. सदर माकड हे जंगलात नेऊन सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी साळुंखे यांनी सांगितले.

Web Title: Monsoon Monkey Forest Department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.