मूग उत्पादकांना दुहेरी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:53 PM2017-10-05T23:53:49+5:302017-10-05T23:56:07+5:30

बुलडाणा : जिल्ह्यातील मूग उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादनातील  घट आणि कमी बाजारभाव असा दुहेरी फटका बसत आहे. स प्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने डागाळलेल्या मुगाची  आधारभूत किमतीपेक्षा ५00 ते ८00 रुपये कमी दराने खरेदी  केली जात आहे. उत्पादनात मोठी घट आल्यामुळे बाजार समि तीमध्ये मुगाची आवक घटली आहे.  

Moong growers double blow | मूग उत्पादकांना दुहेरी फटका

मूग उत्पादकांना दुहेरी फटका

Next
ठळक मुद्देआधारभूत किमतीपेक्षा ८00 रूपये कमी दराने खरेदी मुगाची आवक घटली

हर्षनंदन वाघ । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील मूग उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादनातील  घट आणि कमी बाजारभाव असा दुहेरी फटका बसत आहे. स प्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने डागाळलेल्या मुगाची  आधारभूत किमतीपेक्षा ५00 ते ८00 रुपये कमी दराने खरेदी  केली जात आहे. उत्पादनात मोठी घट आल्यामुळे बाजार समि तीमध्ये मुगाची आवक घटली आहे.  
यावर्षी खरीप हंगामात मुगासह उडीद, योयाबीनची पेरणी  झाल्यानंतर पावसाचा दीर्घ खंड पडला होता. यामुळे वाढीच्या  परिपक्वतेच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला. फूलगळ  झाल्यामुळे शेंगा लागल्या नाहीत. काही ठिकाणी विरळ प्रमाणात  शेंगा लागल्या. अनेक भागात एकरी एक क्विंटलपेक्षाही कमी उ तारा आला आहे.
दीर्घ खंडानंतर ऐन काढणीच्या कालावधीत पावसाने दमदार  हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतशिवारात पाणी साचून  चिखल तयार झाला होता. अशा साचलेल्या पावसात भिजून  शेंगांना मोड फुटले होते. शेंगा भिजल्यामुळे मूग, उडिदाचे दाणे  डागील झाले आहेत; मात्र या पावसाचा सोयाबीन पिकाला काही  प्रमाणात फायदा झाला होता.

मुगाची आवक घटली
बुलडाणा कृषी उपन्न बाजार समितीमध्ये सध्या मुगाची आवक  घटली आहे. मागील महिन्यात मुगाची आवक वाढली होती;  मात्र आता जवळपास २५ क्विंटल आहे, तर भाव ४७00 ते  ४८00 पर्यंत आहे. उडिदाची आवक सुरू असून, दररोज  जवळपास १00 क्विंटल माल येत आहे. त्याला ४ हजार ते  ४१00 पर्यंत भाव मिळत आहे. याशिवाय सोयाबीनची आवक  वाढली असून, दररोज १ हजार क्विंटल माल बाजार समितीत ये त आहे. त्यात सोयाबीनची ओल पाहून भाव देण्यात येत आहे.  सध्या २७00 ते २८00 रूपये भाव देण्यात येत आहे.

ऑक्शन हॉलमध्ये अंधार
बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्यांच्या यार्डवरील  ऑक्शन हॉलमध्ये कोणतीही विजेची व्यवस्था नसल्यामुळे  संध्याकाळी उशिरा आलेला माल अंधारात उतरवावा लागतो.  याठिकाणी विजेची व्यवस्था करण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार  समितीचे आहे; मात्र या समस्येकडे कृषी उत्पन्न बाजार समिती  दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधितांनी लक्ष  देऊन ऑक्शन हॉलमध्ये विजेची व्यवस्था करावी, अशी मागणी  होत आहे.

Web Title: Moong growers double blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.