मोराच्या शिकारीची चौकशी सुरु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 11:15 PM2017-07-22T23:15:25+5:302017-07-22T23:15:25+5:30

वन विभागाने अज्ञात विरुद्ध गुन्ह्याची नोंद करून अभयारण्याच्या परिसरात गस्त वाढविली आहे.

Morar hunting inquiry started! | मोराच्या शिकारीची चौकशी सुरु!

मोराच्या शिकारीची चौकशी सुरु!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : वन्य जीव अभयारण्यात मोराची शिकार करून पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार १८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला होता. या गैरप्रकाराची बातमी ह्यलोकमतह्ण मध्ये १९ जुलै रोजी प्रकाशित होताच वन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. याप्रकरणी वन विभागाने अज्ञात विरुद्ध गुन्ह्याची नोंद करून अभयारण्याच्या परिसरात गस्त वाढविली आहे.
लोणार येथे वन्य जीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले असल्यामुळे या ठिकाणी वन विभागाकडून अनेक दक्षता घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांकडून वारंवार देण्यात येत असतात; मात्र स्थानिक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे या अभयारण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोणार अभयारण्यात शिकार करून पार्टी केल्या जात असल्याचे भयावह चित्र १७ जुलै रोजी समोर आले. १८ जुलै रोजी सकाळी अभयारण्याच्या भोवती अनेक नागरिक पायदळ चकरा मारीत असताना त्या नागरिकांना अभयारण्यातच किन्ही रोडपासून अवघ्या काही अंतरावर सरोवराच्या काठावर दोन चूल आढळून आल्या. एवढेच नव्हे, तर या ठिकाणी कागदाच्या पत्रावळय़ांवर आरोपींनी पार्टी केल्याचे आढळून आले. ही बातमी वार्‍यासारखी शहरात पसरताच वन्य प्रेमींनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, या ठिकाणी चूल पेटवून मेजवानी घेतल्याचे आढळून आले. या घटनेमुळे वन्य प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत असून वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबत लोकमतमध्ये १९ जुलै रोजी बातमी प्रकाशित होताच वन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले असून, त्यांनी गस्त वाढविली आहे.

वन विभाग सक्रिय झाला
लोणार वन्य जीव अभयारण्यात झालेली मोराची शिकार, टिटवी शिवारात झालेला बिबट्याचा संशयास्पद मृत्यू याने वन विभाग सक्रिय झाला असून, अभयारण्याच्या नियमांची अंमलबजावणी सुरु झालेली दिसून येत आहे.

लोणार सरोवराच्या काठाने आता चार चाकी व दुचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. किन्ही रस्त्याजवळील प्रवेशद्वार वाहनांसाठी आता कायम बंद असेल. या ठिकाणी आता २४ तास गार्ड असेल. प्रत्येक पर्यटक व भेट देणारांची नोंद घेतली जाईल.
- लक्ष्मण पाटील,
सहायक वनसंरक्षक,मेहकर.

Web Title: Morar hunting inquiry started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.