सलग दुसऱ्या दिवशी १०० पेक्षा जास्त रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:35 AM2021-02-16T04:35:18+5:302021-02-16T04:35:18+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सलग दुसऱ्या दिवशी १०० पेक्षा जास्त रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला ...

More than 100 patients for the second day in a row | सलग दुसऱ्या दिवशी १०० पेक्षा जास्त रुग्ण

सलग दुसऱ्या दिवशी १०० पेक्षा जास्त रुग्ण

Next

बुलडाणा :

जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सलग दुसऱ्या दिवशी १०० पेक्षा जास्त रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. साेमवारी जिल्ह्यातील १२९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून ३० जणांनी काेराेनावर मात केली आहे. ३०५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर २४, बुलडाणा तालुका : अजिसपूर १, दे. राजा तालुका आळंद २, मेहुणा राजा १, पिंपळनेर २, दे. राजा शहर : ५, खामगाव शहर १२, शेगाव शहर १२, शेगाव तालुका गायगाव बु ३, जानोरी २, चिखली शहर २३, चिखली तालुका सोमठाणा १, भरोसा १, सवणा ४, दे. घुबे १, कवठळ १, शिरपूर १, जांभोरा १, शेलगाव १, गोरेगाव १, जळगाव जामोद तालुका वाडी खु ३, लोणार शहर ६, मोताळा तालुका टाकळी १, सिं. राजा तालुका बारलिंगा १, मलकापूर तालुका माकनेर २, मलकापूर शहर ९, नांदुरा तालुका डिघी १, संग्रामपूर तालुका सावळी ३, मूळ पत्ता तेल्हारा जि. अकोला १, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना १, महागाव जि. यवतमाळ १, डोंगरगाव ता. बाळापूर जि. अकोला येथील एकाचा समावेश आहे.

तसेच कोरोनावर मात केल्यामुळे खामगाव येथील ५, चिखली ६, दे. राजा ७, बुलडाणा अपंग विद्यालय ७, मोताळा १, शेगाव येथील ४ जणांना सुटी देण्यात आली आहे.

तसेच आजपर्यंत १ लाख १५ हजार ६०३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

तसेच ७८० स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले. जिल्ह्यात आज अखेर एकूण १४ हजार ९४४ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १४ हजार १४५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ६२२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १७७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: More than 100 patients for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.