बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या तिप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:08+5:302021-05-29T04:26:08+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ५,४७५ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यांपैकी ५ हजार १९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले ...
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ५,४७५ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यांपैकी ५ हजार १९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ३७, खामगाव २३, शेगाव १२, देऊळगाव राजा १९, चिखली १५, मेहकर ३३, मलकापूर १६, नांदुरा १०, लोणार ८, मोताळा ११, जळगाव जामोद २७, सिंदखेड राजा १७ आणि संग्रामपूर तालुक्यातील ५१ जणांचा समावेश आहे. शुक्रवारी २७९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे; तर चिखली येथील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालापैकी ४ लाख ७० हजार ४७८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आजपर्यंत ८० हजार १८९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
१३८९ अहवालांची प्रतीक्षा
शुक्रवारी १३८९ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८४ हजार ३४९ झाली असून त्यांपैकी ३ हजार ५७० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ५९० जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांवर
गेल्या सहा दिवसांतील सर्वांत कमी पॉझिटिव्हिटी रेट शुक्रवारी नोंदविल्या गेला. तो ५.०९ टक्के होता. २४ मे रोजीचा १२.५५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक रेट होता. मात्र टप्प्याटप्प्याने यातही घट होत असल्याचे चित्र आहे. मात्र जिल्ह्याचा प्रोग्रेसिव्ह पॉझिटिव्हिटी रेट हा अद्यापही १५ ते १६ टक्क्यांच्या आसपास फिरत आहे. त्यामुळे तोही किमानपक्षी १० टक्क्यांच्या खाली येणे अपेक्षित आहे.
३४ टक्क्यांनी सक्रिय रुग्ण घटले
मे महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ही पाच हजार ५००च्या आसपास राहत होती. ती शुक्रवारी ३ हजार ५७० झाली आहे; त्यामुळे ३४ टक्क्यांनी सक्रिय रुग्ण घटल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.
असा घसरतोय पॉझिटिव्हिटी रेट
२३ मे - ११.७६
२४ मे - १२.५५
२५ मे - ९.१०
२६ मे - ८.२६
२७ मे - ८.७३
२८ मे - ५.०९