डाेणगाव येथे डासांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:46+5:302021-04-16T04:34:46+5:30

बसेस बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण जानेफळ : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त ...

Mosquito infestation increased in Daengaon | डाेणगाव येथे डासांचा उपद्रव वाढला

डाेणगाव येथे डासांचा उपद्रव वाढला

Next

बसेस बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण

जानेफळ : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे या संधीचा लाभ घेत खासगी वाहन चालकांनी भाडेवाढ केली आहे.

इंधन वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

सुलतानपूर : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवत असतानाच ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस येत असल्याचे दिसून येते.

रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

बुलडाणा : शहरातील प्रमुख रस्त्यांवर, तसेच चौकालगत भाजी, फळ, तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची गरज आहे.

शासकीय कार्यालयाच्या आवारात भंगार वाहने

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागासमाेर भंगार साहित्य व वाहने पडून आहेत. या वाहनांनी बरीच जागा व्यापली आहे. तसेच इतर शासकीय कार्यालयाच्या आवारातही भंगार झालेली वाहने पडून असल्याचे चित्र आहे.

अहवालास विलंब, काेराेना रुग्णांमध्ये वाढ

माेताळा : येथील कोविड केंद्रातून स्वॅब घेतलेल्या व्यक्तींचा अहवाल प्राप्त होण्यासाठी सहा ते सात दिवसांचा अवधी लागत आहे. त्यामुळे संसर्गित येणाऱ्या व्यक्तीही इतर लोकांप्रमाणे जनमानसात व परिवारात वावरत आहेत. ही बाब इतरांसाठी धोकादायक ठरत आहे.

गुरे चाेरणारी टाेळी सक्रिय

देऊळगाव मही: भुरट्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा गुरांकडे वळविला आहे. येथील शेतकऱ्याची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार

सिंदखेड राजा : उन्हाळ्याची चाहूल लागली असून टंचाईची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार मिळत आहे. मात्र वॉटर एटीएममध्ये टाकण्यासाठी नाण्यांची गरज असून, सध्या नाण्यांचा तुटवडा भासत आहे.

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान

किनगाव जट्टू : परिसरातील वसंत नगर, देवा नगर शिवारात वन्य प्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रोहींचा कळप रात्रंदिवस पिकामध्ये मुक्त संचार करीत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे.

सौर पथदिवे बंद; प्रशासनाचे दुर्लक्ष

बुलडाणा: रात्रीच्या सुमारास प्रकाश राहावा म्हणून बहुतांश गावात शासनाच्या विविध योजनांद्वारे सौरउर्जेवरील पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. देखभालीअभावी हे पथदिवे बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. काही सौरपथदिव्यांमधील बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

दिव्यांगांचा निधी खर्च करण्याकडे दुर्लक्ष

बुलडाणा : दिव्यांग बांधवांसाठी शासन निर्णयाप्रमाणे दरवर्षी पाच टक्के निधी ग्रामपंचायतने खर्च करायचा असतो; परंतु ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांपासून दिव्यांग बांधवांचा निधी खर्च केलेला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दिव्यांग बांधव शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहेत.

Web Title: Mosquito infestation increased in Daengaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.