वादळी वारा व गारपिटीने संग्रामपूर, नांदुरा, खामगावात सर्वाधिक नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:21 AM2018-02-12T01:21:29+5:302018-02-12T01:21:59+5:30

खामगाव : घाटाखालील नांदुरा, संग्रामपूर व खामगाव तालुक्यात वादळी वारा व गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले आहे.  गारपिटीचा तडाखा खामगाव मतदारसंघातील अनेक गावांना बसला. यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी रविवारी दुपारी केली. नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. 

Most damaged by storm winds and hailstorms in Sangrampur, Nandura, Khamgaon. | वादळी वारा व गारपिटीने संग्रामपूर, नांदुरा, खामगावात सर्वाधिक नुकसान!

वादळी वारा व गारपिटीने संग्रामपूर, नांदुरा, खामगावात सर्वाधिक नुकसान!

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार आकाश फुंडकर यांनी केली गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : घाटाखालील नांदुरा, संग्रामपूर व खामगाव तालुक्यात वादळी वारा व गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले आहे.  गारपिटीचा तडाखा खामगाव मतदारसंघातील अनेक गावांना बसला. यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी रविवारी दुपारी केली. नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. 
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी विदर्भात गारपीट होण्याबाबत हवामानाचा अंदाज वर्तविला होता.  सकाळी खामगाव मतदारसंघातील खामगाव व शेगाव तालुक्यातील काही भागात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली.  त्यामुळे गहू, हरभरा इत्यादी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  ही माहिती समजताच  आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी मतदारसंघातील रोहणा, कोन्टी, वर्णा, नांद्री, काळेगाव, ढोरपगाव, कवडगाव, बेलखेड आदी गावांचा तातडीने दौरा करून गारपीटग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तहसीलदार सुनील पाटील, जि. प. सभापती डॉ. गोपाल गव्हाळे,  तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, उपसभापती भगवानसिंह सोळंके, शत्रुघ्न पाटील, लाला महाले, समाधान मुंढे, तालुका सरचिटणीस शांताराम बोधे, हरसिंग साबळे व कृषी विभागाचे अधिकारी व कृषी सहायक उपरोक्त गावाचे तलाठीदेखील उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांना धीर दिला. 

रब्बी पिकासह फळबागांचे नुकसान, शेतमजूर जखमी 
वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्‍यासह गारपीट मोठय़ा प्रमाणात झाली. त्यात रब्बी  पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये हरभरा, गहू, भाजीपाला, कांदा, टरबूज, मिरची, मका आदी पिकासह संत्रा आदींचा समावेश आहे. 
वादळी वार्‍यानेबावनबीर येथील शाळेची टिनपत्रे उडाली. संग्रामपूर येथील तहसीललगत टपर्‍या उडाल्या. आलेवाडी येथील घरावरची टिनपत्रे उडाली.तालुक्यातील झालेल्या गारपिटीमध्ये पातुर्डा बु. सोनाळा, लाडणापूर, बावनबीर आदी गावातील फळबाग उत्पादक शेतकर्‍यांचे लिंबू, संत्र्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. 
संजय ढगे यांच्यासह बावनबीर लाडणापूर येथील विजय हागे आदी  शेतकर्‍याच्या शेतातील टरबूज पीक उद्ध्वस्त झाले. तालुक्यातील आदिवासी भागातील सायखेड आलेवाडी सोनाळा, चिचारी, लाडणापूर या परिसरातील टमाटे, मिरची, गहू, कांदा, खरबूज, टरबूज, हरभरा, संत्रा, लिंबूचे सर्वाधिक नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची आमदार संजय कुटे यांनी तातडीने पाहणी करून महसूल व कृषी विभागाने तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश दिले आहेत. 

संयुक्त सर्व्हे करा - सुनील पाटील
सर्व मंडळ अधिकार्‍यांना त्यांच्या मंडळातील गारपीट नुकसानाचा सर्व्हे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलाठी व कृषी सहायक मिळून गारपीट नुकसानाचा सर्व्हे करायचा आहे, अशा सूचना जिल्हा कृषी अधीक्षक बुलडाणा यांनी दिल्या आहेत. कुणाला लेखी पाहिजे असल्यास त्या संबंधित कर्मचार्‍यांनी ऑफिसमधून पत्र घेऊन जावे किंवा या संदेशाचा संदर्भ देऊन सर्व्हे सुरू करावा.             

गारपिटीमुळे जखमी शेतमजुरावर खासगी रुग्णालयात उपचार 
लाडनापूर येथील शेतमजुू सागर गजानन अगळते, दीपक सपकाळ, शांताराम रामकृष्ण सोनोने, रवींद्र सोनोने रा. लाडणापूर या शेतकर्‍याची तूर काठणाचे काम सुरू अचानक वादळी वार्‍यासह आलेल्या गारांनी झोडपून काढले तर पातुर्डातील शेतकरी गजानन दाभाडे, गजानन राहाटे हे शेतात पर्‍हाटी उपटत असताना गारांच्या मार्‍यामुळे जखमी झाले, त्यामुळे जखमी शेतमजुरावर उपचार करण्यासाठी शेतकरी, नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जळगाव जामोद : प्रचंड गारपीट, पिकांची हानी
रविवारी सकाळी संग्रामपूर तालुक्यात झालेल्या प्रचंड गारपिटीने पिकांची मोठी हानी झाली असून, वादळी वार्‍याने आदिवासी गावातील घरांच्या छताचे नुकसान झाले आहे. या अकस्मात झालेल्या गारपिटीने शेतकरी हारदला असून शेतमालाची लाखोंची हानी झाली आहे. या भागाला तातडीने आ.डॉ. संजय कुटे व पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी भेटी देऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. आ.डॉ. संजय कुटे यांनी प्रशासनाला तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देशसुद्धा दिले. 

Web Title: Most damaged by storm winds and hailstorms in Sangrampur, Nandura, Khamgaon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.