‘सीएए’च्या विरोधात मोताळा ते बुलडाणा पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:24 IST2020-02-25T15:24:22+5:302020-02-25T15:24:32+5:30
बुलडाणा येथील शाहिनबाग आंदोलनापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

‘सीएए’च्या विरोधात मोताळा ते बुलडाणा पदयात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/मोताळा : नागरिकत्त्व संशोधन कायद्याविरोधात मोताळा येथील नागरिकांनी २४ फेब्रुवारी रोजी मोताळा ते बुलडाणा पदयात्रा काढली. शेकडो नागरिक येथील शाहिनबाग आंदोलनस्थळी पोहचले. यानंतर नागरिकत्त्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मोताळा तहसील कार्यालयासमोर ४२ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. २४ फेब्रुवारी रोजी मोताळा येथील तहसील कार्यालयाच्या धरणे आंदोलनाच्या मंडपापासून ते बुलडाणा येथील शाहिनबाग आंदोलनापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
तगडा पोलिस बंदोबस्त
सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याच्या विरोधात मोताळा ते बुलडाणा पदयात्रा काढण्यात आली. यादरम्यान बोराखेडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गुरूड यांनी बुलडाणा मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. बुलडाणा येथे देखील पोलिस आंदोलनस्थळी हजर होते.