अटल भूजल योजनेंतर्गत मोताळा तालुक्याचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:51+5:302021-02-06T05:04:51+5:30
खा. प्रतापराव जाधव व आ. संजय गायकवाड यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने या योजनेंतर्गत मोताळा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. ...
खा. प्रतापराव जाधव व आ. संजय गायकवाड यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने या योजनेंतर्गत मोताळा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. १९८० च्या राज्य शासनाच्या अवर्षण प्रवण तालुक्यांच्या यादीत मोताळा तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे येथे जलसंधारणाच्या कामांना मोठा वाव आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेंतर्गत जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यात मोताळा तालुक्याच्या वाटेला १०० कोटींच्या आसपास रक्कम मिळणार आहे.
दुसरीकडे योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी संबंधित खात्याचे कर्मचारी, अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य व अन्य अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक १३ नोव्हेंबरनंतर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ. संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली. दरम्यान, या संदर्भातील बैठकीकडे राजकीय दृष्टीकोनातून न पाहता तालुका जलसंपदेच्या दृष्टीने समृद्ध होण्यासाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न करण्याची गरज आहे.