तीन महिन्यांच्या चिमुकलीसह मातेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:52 AM2017-08-26T00:52:52+5:302017-08-26T00:53:06+5:30
तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत ये त असलेल्या शेलगाव काकडे येथे एका विवाहित महिलेने तीन महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. उ परोक्त घटना २४ ऑगस्टला उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत ये त असलेल्या शेलगाव काकडे येथे एका विवाहित महिलेने तीन महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. उ परोक्त घटना २४ ऑगस्टला उघडकीस आली.
शेलगाव काकडे येथील समाधान सरकटे यांच्या सिंधू या मुलीचे लग्न कोलवड येथील अमोल जाधव या इसमासोबत दोन वर्षांपूर्वी झाले होते. अमोल हा नाशिक येथे मोलमजुरीचे काम करून संसाराचा गाडा चालवित होता. या संसार वेलीवर मुलीचा जन्म झाला.
सिंधूचे बाळंतपण माहेरी शेलगाव काकडे येथे झाल्यानंतर ती नाशिकला परत गेली. काही दिवस तेथे राहिल्यानंतर परत शेलगाव काकडे येथे मुलीसह आली. आई-वडिलांसोबत राहत असताना जीवनात घडलेल्या घटनांमुळे आणि अमोल जाधव याच्या व्यसनीपणामुळे सिंधू जीवनाला कंटाळली. नैराश्य कायम मनात घर करून बसले. अखेर २४ ऑगस्टला सकाळी मनोहर उत्तमराव आव्हाळे यांच्या शेतातील विहिरीत तिने चिमुकली अर्चनासह उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा भाऊ सतीश हा विहिरीवर गुरांना पाणी पाजण्यासाठी गेला असता भाची अर्चना ही पाण्यावर तरंग ताना दिसली. त्याने लागलीच घरात सिंधूची चौकशी केली असता ती आढळून आली नाही. मनोहर आव्हाळे यांना माहिती मिळताच त्यांनी गावातील लोकांच्या सहकार्याने सिंधूचा विहिरीत शोध घे तला. तेव्हा तिचेही प्रेत विहिरीत सापडले. उपरोक्त घटनेची माहिती सतीश समाधान सरकटे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली. पुढील तपास पीएसआय दीपक राणे करीत आहेत.