जागतीक आदिवासी दिनानिमित्त रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 07:50 PM2017-08-10T19:50:52+5:302017-08-10T19:51:32+5:30
लोणार : ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाच्या सर्वच पक्षाच्या, संघटनेच्या पदाधिकारी व शासकीय कर्मचारी तसेच महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाच्या सर्वच पक्षाच्या, संघटनेच्या पदाधिकारी व शासकीय कर्मचारी तसेच महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
राज्यात ९ आॅगस्ट हा दिन जागतिक आदिवासीदिन म्हणून साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण आमसभेच्या ठरावाद्वारा ९ आॅगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून जाहिर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने हा दिन राज्यातही ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान कोकाटे यांच्या नेतृत्वात ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाच्या सर्वच पक्षाच्या, संघटनेच्या पदाधिकारी व शासकीय कर्मचारी तसेच महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. आदिवासी उपयोजना क्षेत्र व बिगर आदिवासी उपयोजना क्षेत्रात रोजगाराच्या संधी, शेती विषयक योजना, आरोग्य व पोषण विषयक योजनांची माहिती, वन उत्पादने व शेतीमाल यावर आधारित उद्योग याबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. आदिवासींच्या विकासाकडे आणि त्यांच्या सुविधांकडे शासनाने सातत्याने लक्ष घालावे व समाजाचे जीवनमान उंचवावे. आदिवासी बांधवाना सुविधा पुरवण्याची जबाबदारी प्रामुख्याने शासनाने पूर्ण करावी. आदिवासींसाठी असलेला विकास निधी हा त्यांच्यापर्यंत पोहचता करावा, यासाठी शासन दरबारी आपला लढा कायम राहील असे प्रतिपादन ९ आॅगस्ट रोजीच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्या गोदावरी कोकाटे यांनी केले. यावेळी माजी पं.स.सभापती ज्ञानेश्वर चीभडे, पं.स.विस्तार अधिकारी माधव कोकाटे, नामदेवराव कोकाटे, विष्णू तनपुरे, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कोकाटे, आश्रुबा कोकाटे, धोंडू कोकाटे, निवृत्ती धोत्रे, पंढरी कोकाटे, संतोष राऊत , पंढरी फुपाटे , बबन तनपुरे, रामेश्वर घाटे, रामेश्वर इंगळे, बबन कोकाटे, नारायण जाधव, मदन धोत्रे, उद्धव कोकाटे, सुभाष गोदमले, वासुदेव जटाळे , पोलीस पाटील पंढरी फुपाटे यांचेसह हजारो समाजबांधव ब महिलांची उपस्थिती होती.