भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त मोटारसायकल रॅली
By अनिल गवई | Published: May 10, 2024 12:08 PM2024-05-10T12:08:23+5:302024-05-10T12:09:05+5:30
भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्यावतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम शुक्रवारी घेण्यात आले. सकाळी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर मोटार सायकल रॅलीला सुरूवात झाली.
खामगाव: ब्राम्हण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी खामगाव शहरातून भव्य मोटारसायकल रॅली, शोभायात्रा सकाळी १० वाजता काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानातील भगवान परशुराम व्यायाम शाळेसमोरून या रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीत सर्व भाषिक ब्राम्हण समाज बांधवांनी सहभाग दिला.
भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्यावतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम शुक्रवारी घेण्यात आले. सकाळी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर मोटार सायकल रॅलीला सुरूवात झाली. ही रॅली गुरूद्वारा सिंघ सभा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर रायगड कॉलनीतील महाराष्ट्र ब्राम्हण सभेत मोटार सायकल रॅलीचा समारोप महाआरतीने करण्यात झाला. त्यानंतर ब्राम्हणसमाजातील मातृशक्तीच्यावतीने वीर हनुमान मंदिर फरशी येथे गौमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी गोमातांना गौग्रास देण्यात आला. त्याचप्रमाणे युवा ब्रम्ह शक्तीच्यावतीने क्रातीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले सामान्य रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.