अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त खामगाव शहरात मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:26 PM2018-08-14T13:26:29+5:302018-08-14T13:27:27+5:30

खामगाव : अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त विश्व हिंदु परिषद व बजरंग दलातर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. 

Motorcycles rally in Khamgaon on the occasion of Akhand Bharat Sankalp Day | अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त खामगाव शहरात मोटारसायकल रॅली

अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त खामगाव शहरात मोटारसायकल रॅली

Next
ठळक मुद्देविश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने १४ आॅगस्टरोजी शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली.विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

खामगाव : अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त विश्व हिंदु परिषद व बजरंग दलातर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. 
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने १४ आॅगस्टरोजी शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली. यामध्ये जिल्हाभरातीलच नव्हेतर विदर्भातील अनेक ठिकाणाहून आलेले विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोटारसायकल रॅलीचे नेतृत्व बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक अमोलभाऊ अंधारे यांनी केले होते. जय भवानी जय शिवाजी, हरहर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणांनी शहर दणाणून गेले होते. रॅलीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. काहींनी पुष्पवृष्टी करीत तर काही ठिकाणी फटाक्यांच्या आतीषबाजीत स्वागत झाले. रॅलीत सहभागी युवकांमध्ये देशप्रेम दिसून येत होते. रॅलीचा समारोप शहरातील कोल्हटकर स्मारक मंदिरासमोर झाला. याठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होेते. शामसुंदर गोरक्षण संस्थान पारस येथून हभप लक्ष्मीनारायण दायमा महाराज यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी युवकांना संबोधित केले. भाषणासाठी युवकासह महिला, पुरुषांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.

Web Title: Motorcycles rally in Khamgaon on the occasion of Akhand Bharat Sankalp Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.