ट्रॅक्टरच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:58+5:302016-03-16T08:36:58+5:30

इसोली गावाजवळ अपघात.

A motorcyclist killed in the tractor crash | ट्रॅक्टरच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

Next

अमडापूर (बुलडाणा): जवळच असलेल्या इसोली गावाजवळ ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. ही घटना अमडापूर इसोली रोडवर १५ मार्च रोजी घडली आहे. अमडापूर पोलिसात तक्रार दिली, की १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता फिर्यादीचे पती देवीदास विश्‍वनाथ कोठाळे (वय ३६) हे अमडापूरकडून इसोली येथे एम.एच.२८ एएच ३७१0 क्रमांकाच्या मोटारसायकलने घरी येत होते. दरम्यान, इसोलीकडून संजय रसाळ यांचा विनानंबरचा ट्रॅक्टर भरधाव येत असताना ट्रॅक्टर चालकाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात देवीदास कोठाळे हे जागीच ठार झाले. पत्नीच्या तक्रारीवरून कलम २७९, ३0४, (अ) ४२७, भादंविप्रमाणे ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: A motorcyclist killed in the tractor crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.