राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वात शेतकर्यांचे आंदोलन; चिखली-मेहकर मार्गाचे काम पाडले बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:34 AM2018-01-31T00:34:29+5:302018-01-31T00:35:18+5:30
चिखली: शेतकर्यांच्या जमिनी कुठलीही सूचना न देता व जमीन अधिग्रहणाची कार्यवाही न राबविता चालविली असल्याचा आरोप करीत या मार्गावरील शेतकर्यांनी आधी जमिनीचा योग्य मोबदला द्या, नंतरच रस्त्याचे काम सुरू करा, अशी भूमिका घेत आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली-मेहकर रस्ता चौपदरीकरणाचे काम ३0 जानेवारी रोजी बंद पाडले.
लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली ते मेहकर रस्त्याचे चौपदरीकरणासाठी प्रशासनाने या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकर्यांच्या जमिनी कुठलीही पूर्व सूचना न देता व भूसंपदनाची कुठलीही कायदेशीर कार्यवाही पूर्ण न करता शेतजमीन खोदकामास सुरुवात केल्याचा आरोप करीत शेतकर्यांनी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार एकलारा, आंबाशी फाट्यावर आ. बोंद्रे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकर्यांनी चिखली-मेहकर मार्गाचे काम सकाळी ११ वाजेपासून बंद पाडले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, रमेश सुरडकर, ज्ञानेश्वर सुरूशे, अशोक पडघान, संजय पांढरे, ज्येष्ठ पत्रकार अनिल पळसकर, पं.स. सदस्य लक्ष्मण आंभोरे, शे. नासेर, रूपराव पाटील, मदन म्हस्के, सुनील म्हस्के, अरविंद झाल्टे, गजानन परिहार, शिवाजी पवार, सचिन बोंद्रे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भालगाव, कोलारा, मुंगसरी, आमखेड, खैरव, आंबाशी, एकलारा, येथील शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, या रस्त्यात शेत जमिनी जाणार्या शेतकर्यांशी शासनाचे बोलणे होऊन तोडगा निघाल्याशिवाय रस्त्याचे पुढील काम सुरू करणार नसल्याचे संबंधित कंत्राटदार पवन पाटील यांनी स्पष्ट केले.