गारपिटीच्या नुकसान भरपाईसाठी कोराडी धरणात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 14:30 IST2018-05-30T13:34:15+5:302018-05-30T14:30:16+5:30
मेहकर : जवळच असलेल्या देऊळगाव माळी येथे १३ फेब्रुवारी रोजी गारपीट झाली होती.

गारपिटीच्या नुकसान भरपाईसाठी कोराडी धरणात आंदोलन
ठळक मुद्देसर्वे दरम्यान तलाठी, कृषी सहायक यांनी खºया नुकसानग्रस्तांना मदतीच्या यादीतून वगळले होते. ग्रामस्थांनी कोराडी धरणात पाण्यात बसून ३० मे रोजी सकाळी ९ वाजता पासून आंदोलन सुरू केले आहे.
मेहकर : जवळच असलेल्या देऊळगाव माळी येथे १३ फेब्रुवारी रोजी गारपीट झाली होती. त्यावेळी सर्वे दरम्यान तलाठी, कृषी सहायक यांनी खºया नुकसानग्रस्तांना मदतीच्या यादीतून वगळले होते. यास जबाबदार अधिकाºयांवर कारवाई व्हावी व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरिधर ठाकरे पाटील यांचे नेतृत्वात देऊळगाव माळी येथील पवन गाभने, विजय सुरूसे, वैभव मगर, विशाल मगर, मोहन मगर, विनोद फलके, गजानन गाभने, रमेश गोडवे यांचेसह ग्रामस्थांनी कोराडी धरणात पाण्यात बसून ३० मे रोजी सकाळी ९ वाजता पासून आंदोलन सुरू केले आहे.