‘मिठाची मिठाई’ देऊन लोणार येथे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:16 AM2017-10-12T00:16:25+5:302017-10-12T00:17:27+5:30
लोणार : दारिद्रय़रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते नितीन शिंदे यांनी पदाधिकार्यांसोबत तहसील कार्यालयात जाऊन पुरवठा विभागाला मिठाची मिठाई भेट देऊन अभिनव पद्धतीने आंदोलन करून सणासुदीच्या दिवसात साखर वाटप करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

भाजप सरकारने ऐन सणासुदीच्या काळात साखर बंद केल्याने तालुक्यातील सुमारे ९000 दारिद्रय़रेषेखालील, तर ६५00 अंत्योदय कुटुंबांची यंदाची दिवाळी गोड होणार नाही. शासनाने बीपीएल कुटुंबांची साखर बंद करून गरिबांना चहा पिणेही अवघड केले आहे. अंत्योदय कुटुंबांनाही अल्प दरात मिळणारी साखर २0 रुपये केली आहे. सण उत्सव सुरू असताना योग्य निर्णय न घेता राज्य सरकारने केंद्राचा निर्णय म्हणून हात झटकले आहेत. राज्य सरकारने तिजोरीतून काही निधी खचरून पात्र धारकांना साखर उपलब्ध करून द्यावी, केंद्राने इंधन दरवाढीतून लुटलेला पैसा गरिबांसाठी साखर खरेदीवर वापरावा, असे सांगून रेशन व्यवस्था संपविण्याचे षड्यंत्र सरकार रचत असल्याचा आरोप नितीन शिंदे यांनी केला.
गोरगरिबांच्या तोंडची साखर हिरावून घेऊ नका, असे सांगत कार्डधारकांना दिवाळीसाठी साखर उपलब्ध करून न दिल्यास संबंधित अधिकारी व भाजपा पदाधिकार्यांना ऐन दिवाळीच्या दिवशी पुन्हा मिठाची मिठाई भेट देण्याचा इशारा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यावेळी नगराध्यक्ष भूषण मापारी, साहेबराव पाटोळे, शेख असलम शेख कासम, माजीद कुरेशी, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते एजाज खान उपस्थित होते.