बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीच्या हालचाली; रिक्त जागांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 02:46 PM2017-12-21T14:46:10+5:302017-12-21T14:48:00+5:30
बुलडाणा : प्रामुख्याने पश्चिम विदर्भात प्राबल्य असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या रिक्त असलेल्या काही संघटनात्मक पदावर पदाधिकार्यांच्या २० डिसेंबर रोजी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही काळापासून ही पदे रिक्त होती. मात्र आता या नियुक्त्या करण्यात आल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने हालचाली सुरू केल्याचे संकेत या माध्यमातून दिल्या जात आहेत.
बुलडाणा : प्रामुख्याने पश्चिम विदर्भात प्राबल्य असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या रिक्त असलेल्या काही संघटनात्मक पदावर पदाधिकार्यांच्या २० डिसेंबर रोजी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही काळापासून ही पदे रिक्त होती. मात्र आता या नियुक्त्या करण्यात आल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने हालचाली सुरू केल्याचे संकेत या माध्यमातून दिल्या जात आहेत. नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बुलडाणा विधानसभा उपजिल्हा प्रमुखपदी संजय गायकवाड आणि भोजराज पाटील यांची नियुक्ती केली गेली आहे. बुलडाणा तालुका प्रमुख म्हणून वैद्यकीय क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. मधुसुदन सावळे यांची वर्णी लागली असून बुलडाणा शहर प्रमुख पदी गजेंद्र दांदडे यांचे नाव घोषित झाले आहे. गेल्या काही दिवसापासून ही पदे रिक्त होती. ती पदांवर आता या नियुक्त्या करण्यात आल्याने पक्ष संघटन मजबुतीला शिवसेने प्राधान्य दिल्याचे दृष्टीपथास येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेची तशी पकड चांगली आहे. त्यानुषंगाने गेल्या आठ दिवसापूर्वीच घाटावर व घाटाखाली पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये घाटावरील चिखली, बुलडाणा, मेहकर आणि सिंदखेड राजा मतदार संघासाठी जिल्हा प्रमुख म्हणून जालिंदर बुधवत आणि घाटाखाली दत्ता पाटील यांनी जिल्हा प्रमुख म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली होती. दत्ता पाटील यांच्याकडे घाटाखालील मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद या मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील आणखी काही पदाधिकार्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी लढणारा पक्ष असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि जिल्हा संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार मिळालेल्या जबाबदारीला तितक्याच सक्षमपणे पेलून संघटनात्मक मजबुतीला प्राधान्य देऊ, अशी प्रतिक्रिया यासर्व पार्श्वभूमीवर जालिंदर बुधवत यांनी दिली आहे. या नियुक्त्याच्या अनुषंगाने जिल्हा शिवसेनेच्या वतीने खा. प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात नवनियुक्त पदाधिकार्यांचा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सिंधूताई खेडेकर, पालिका उपाध्यक्ष विजय जायभाये, दीपक सोनुने, उमेश कापूरे, अशोक इंगळे, लखन गाडेकर, कैलास माळी, बाजार समितीचे श्रीकांत पवार, रमेश गायकवाड, बाळासाहेब नारखेडे, माणिकराव सावळे, डॉ.गोपाल डिके, लक्ष्मणराव डुकरे, राजू मुळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.