स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By admin | Published: June 24, 2017 01:46 PM2017-06-24T13:46:28+5:302017-06-24T13:46:28+5:30

स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे राणा चंदन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातआंदोलन करण्यात आले.

Movement of Swabhimani Shetkari Sanghatana | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Next

बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ज्या संचालकांनी जिल्हा
बँकेवर २०९ कोटीचा डल्ला मारून शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी वंचित
ठेवले, त्या संचालकांची वसुली करण्यात यावी, या मागणीसाठी  स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात
आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की,  सरकारने काही दिवसापुर्वी राज्यातील शेतकऱ्यांना
कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे ज्या संचालकांनी जिल्हा
केंद्रीय सहकारी बँक बुडविली त्या संचालकांना कर्ज माफीचा कोणताही फायदा
शासनाने देवू नये, जिल्हा बँक बुडविणाऱ्या संचालकांची तात्काळ वसुली करुन
त्यांच्या मालमत्ता शासनाने जप्त करुन बँक सुरळीत करावी, जेणेकरुन
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध होईल व नव्या दमाने पुन्हा
जिल्हा बँकेत जावून पेरणीसाठी कर्ज घेईल अशाप्रकारे याबाबीकडे शासनाने
लक्ष देवून संचालकांची थकीत वसुली करावी,  अशा प्रकारची मागणी स्वाभिमानी
शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
मागणी पुर्ण न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा जिल्हा बँक व
प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी निवेदनातून
देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर स्वाभिमानीचे
जिल्हा अध्यक्ष कैलास फाटे, अमिन खासाब, ज्ञानदेव हरमकार, हरिभाऊ
उबरहंडे, शेख साजीद, तुषार काचकुरे, शेख रफीक शेख करीम, अनिल पडोळ
यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.          (प्रतिनिधी)

Web Title: Movement of Swabhimani Shetkari Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.