आंदोलनांचा मंगळवार!
By admin | Published: February 10, 2016 02:15 AM2016-02-10T02:15:31+5:302016-02-10T02:15:31+5:30
राष्ट्रवादीचे बुलडाणा जिल्ह्यात आंदोलन; कोतवाल संघटनेसह कृषी व्यावसायिकही रस्त्यावर.
बुलडाणा: राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज ९ फेब्रुवारी रोजी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. महसूल विभागातील शेवटचा व महत्त्वाचा घटक असलेले कोतवाल अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. कोतवालांना चतुर्थश्रेणी लागू करावी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोतवाल संघटनेकडून आज ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करावी, कोतवाल संवर्गातून तलाठी व तत्सम पदासाठी २५ टक्के पदोन्नती मिळावी, सेवानवृत्त कोतवालांना पेन्शन व वारसांना नोकरी मिळावी, ५ तारखेपर्यंंंत पगार, कोतवालातील शिपाई पदावर २५ टक्के पदे भरण्यात यावी या मागण्यांसाठी हे आंदोनल केले या आंदोलनात कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर भगत, जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश शेळके यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील कोतवाल मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.