विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत आंदोलन

By admin | Published: August 26, 2015 12:38 AM2015-08-26T00:38:57+5:302015-08-26T00:38:57+5:30

वडशिंगी येथील शाळेला शिक्षक देण्याची मागणी.

Movement in the Zilla Parishad of the students | विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत आंदोलन

विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत आंदोलन

Next

बुलडाणा : जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांची तीन पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरा, यासाठी वडशिंगी येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांंसह पालकांनी मंगळवारी दुपारी बुलडाणा येथे जिल्हा परिषदेपुढे ठिय्या आंदोलन केले. वडशिंगी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये चालू शैक्षणिक सत्रासाठी उच्चश्रेणी शिक्षकांची चार पदे मंजूर आहेत; मात्र शाळेत एक शिक्षक कार्यरत असून, इतर तीन पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहे. यात इयत्ता आठवी, नववी आणि दहावी वर्गासाठी गणित विषयाच्या शिक्षकाचे एक पद आणि सहायक अध्यापकांची दोन पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांची ही रिक्त पदे त्वरित भरण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांंसह पालकांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी पालकांनी जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात ७0 विद्यार्थ्यांंसह त्यांचे पालकदेखील सहभागी झाले होते.

Web Title: Movement in the Zilla Parishad of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.