कोरोना चाचणी अहवाल वेळेत देण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:49+5:302021-04-29T04:26:49+5:30
यासोबतच या व्यवस्थेत सुसूत्रता येण्यासाठी रॅपीड टेस्ट ही बुलडाणा येथील सर्क्युलर रोडवर असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील कोविड केअर सेंटर ...
यासोबतच या व्यवस्थेत सुसूत्रता येण्यासाठी रॅपीड टेस्ट ही बुलडाणा येथील सर्क्युलर रोडवर असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील कोविड केअर सेंटर येथे करण्याचा व आरटीपीसीआरची टेस्ट ही अपंग विद्यालयात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्यानंतर कोरोना चाचण्यांचे अहवाल वेळेत संदिग्ध रुग्णांना न मिळाल्यास त्याची संयुक्त जबाबदारी ही जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नितीन तडस आणि प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. सांगळे यांच्यावर निश्चित करण्यात आली असल्याचेही उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी स्पष्ट केले आहे.
--सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश--
कोरोना चाचणीचे अहवाल संदिग्धांना वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी प्रयोगशाळेत इंटरनेट सुविधा देण्यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक संगणक आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एक संगणक प्रयोगशाळेस देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यासोबतच महसूल विभागाने अर्थात बुलडाणा तहसील कार्यालयाने या कामासाठी प्रयोगशाळेस पाच संगणक ऑपरेटर उपलब्ध करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने हालचालींनी आता वेग घेतला आहे.