एमपीएससी, रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी, विद्यार्थ्यांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:58 AM2021-03-16T07:58:28+5:302021-03-16T07:58:57+5:30

राज्यसेवा आयाेगाची विविध पदांसाठीची पूर्वपरीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २१ मार्च राेजी घेण्यात येत आहे.

MPSC, Railway examination on the same day | एमपीएससी, रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी, विद्यार्थ्यांना भुर्दंड

एमपीएससी, रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी, विद्यार्थ्यांना भुर्दंड

Next

संदीप वानखडे -
बुलडाणा
: राज्यसेवा (एमपीएससी) आयाेगाची पूर्वपरीक्षारेल्वे भरती (आरआरबी) बाेर्डाची परीक्षा २१ मार्च राेजी एकाच दिवशी वेगवेगळ्या केंद्रांंवर घेण्यात येणार आहे. या दाेन परीक्षांपैकी एकच परीक्षा देता येणार असल्याने विद्यार्थ्यांसमाेर पेच निर्माण झाला आहे.

राज्यसेवा आयाेगाची विविध पदांसाठीची पूर्वपरीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २१ मार्च राेजी घेण्यात येत आहे. रेल्वेकडून विविध पदांसाठी देशभरात विविध केंद्रांवर पाच टप्प्यांत परीक्षा घेण्यात येत आहेत. येत्या २१ मार्चला देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा हाेणार आहे.

रेल्वेची परीक्षा पूर्वनियाेजित
रेल्वेच्या ३२ हजार २०८ जागांसाठी पाचव्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहेत. देशभरातील १९ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.

लाॅकडाऊनचाही फटका
काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पाेहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. लाॅकडाऊन असलेल्या शहरांमध्ये राहण्याची साेय हाेणार नसल्याने विद्यार्थ्यांची परवड होणार आहे.

विद्यार्थ्यांना बसला भुर्दंड
लाॅकडाऊननंतर शहरांमध्ये अभ्यास करण्यासाठी गेलेले विद्यार्थी गावी परतले आहेत. या विद्यार्थ्यांनी १४ मार्चला हाेणाऱ्या परीक्षेला जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षणही केले हाेते. मात्र, ऐनवेळी ‘एमपीएससी’ने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना नाहक भुर्दंड बसला आहे.
 

Web Title: MPSC, Railway examination on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.