वीजचाेरीविरुद्ध महावितरणची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:37+5:302021-01-23T04:35:37+5:30
बुलडाणा : सिंदखेडराजा शहरासह तालुक्यामध्ये वीजचोरीचे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही वीजचोरी रोखण्यासाठी अमरावती व वर्धा येथील फ्लाईंग ...
बुलडाणा : सिंदखेडराजा शहरासह तालुक्यामध्ये वीजचोरीचे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही वीजचोरी रोखण्यासाठी अमरावती व वर्धा येथील फ्लाईंग स्कॉडने गेल्या महिनाभरात ७७ जणांविरुद्ध कारवाई करत जवळपास बारा लक्ष रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सिंदखेडराजा तालुक्यासह शहरात वीज चोरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत असून नेहमी रोहित्रात बिघाड होत आहे. परिणामी वीज चोरी करणाऱ्यांमुळे मीटर असलेल्या वीज ग्राहकांना नाहक त्रास होत असून, एकदा रोहित्र बिघडले की पंधरा-पंधरा दिवस गावे अंधारात राहतात. त्यामुळे विशेष पथकाने धडक मोहीम हाती घेतली आहे.
यामध्ये मीटरमध्ये छेडछाड करणे, मेनलाईनवर आकडे टाकणे यासह विविध प्रकारे विजेची चोरी करणाऱ्या शहरासह तालुक्यातील ७७ जणांविरुद्ध कारवाई करून १२ लाखांचा दंड विशेष पथकाने वसूल केला आहे. यामध्ये शहरातील ६ वाईनबार, लॉज या ठिकाणी व कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात अशी कारवाई केली जात आहे.