हमीभाव व महाबीजच्या दरात तफावत: हरबऱ्यावर ४०२ रुपयांचा ‘घाटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:56 PM2018-09-30T17:56:36+5:302018-09-30T17:57:01+5:30
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत हरबरा बिजोत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव व महामंडळाच्या दरातील तफावतीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. हरबरा गे्रडींग होऊन बियाणे पास झालेले असतानाही महामंडळाकडून बियाण्याची किंमत ४ हजार ४८ रुपये प्रतिक्ंिवटल देण्यात येत आहे. तर दुसरीकडे शासनाचे हमीभाव ४ हजार ४५० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत; त्यामुळे शेतकºयांचा हरबºयावर प्रतिक्ंिवटलमागे ४०२ रुपयांचा घाटा होत आहे.
‘गुणवत्तापूर्ण बियाणे’ हे ब्रीद घेऊन अकोला येथे १९७६ मध्ये स्थापन झालेल्या महाबीजचे बियाणे संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशातील इतर राज्यातही पोहचले आहे. सुरूवातीला राज्यातील अकोला, बुलडाणा, परभणी व नांदेड या जिल्ह्यांपुरताच महामंडळाच्या बिजोत्पादनाचा कारभार मर्यादीत होता. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळावर शेतकºयांचा विश्वास वाढत गेल्याने महामंडळाची व्याप्ती झपाट्याने होत गेली. राज्यात कडधान्य उत्पादीत करण्यावरही महामंडळाकडून विशेष प्रयत्न केल्या जात असून त्यासाठी गावोगावी बिजोत्पादन वाढीसाठी विशेष प्रोत्साहन योजना सुरू आहेत. शेतकºयांकडून बिजोत्पादन कार्यक्रमातून बियाणे खरेदी करण्यात येते. २०१७-१८ या वर्षामध्ये महामंडळामार्फत अनेक शेतकºयांनी हरबरा बिजोत्पादन कार्यक्रमामध्ये सहभाग घेवुन बियाणे उत्पादित करून एप्रिल- मे मध्ये महाबीजकडे बियाणे विक्री केले. त्याची ग्रेडींग होऊन बियाणे पास झालेले आहे. महामंडळाकडून बियाण्याची किंमत ४ हजार ४८ रुपये प्रतिक्ंिवटल याप्रमाणे देण्यात येत आहे. परंतू हरबºयासाठी शासनाचे हमीभाव ४ हजार ४५० रुपये असताना महाबीजकडून शेतकºयांना ४०२ रुपयाने कमी दर मिळत आहेत. बिजोत्पादनास लागणारा खर्च व शेतकºयांचे परिश्रम यातुलनेत भाव कमी मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भात महाबीजचे व्यवस्थापक देशमुख याच्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
बिजोत्पादक शेतकऱ्यांची महाबीजकडे धाव
बिजोत्पादन कार्यक्रमामध्ये हरबºयाला महाबीजकडून हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने बुलडाणा तालुक्यातील शेषराव सुसर, भगवान शेळके, बाजीराव सुसर, विठ्ठलराव किलबिले, कैलास सुसर या शेतकºयांनी महाबीजकडे धाव घेवून हरबरा बिजोत्पादनासाठी कमी भाव मिळत असल्याची समस्या मांडली. बिजोत्पादनास लागणारा खर्च विचारात घेवून जादा भाव देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, याकरीता शासनाकडून प्रयत्न होतात. परंतू महाबीजकडून हरबरा बियाण्यास कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शासनाच्या हमीभावापेक्षा २० टक्के जास्त भावाप्रमाणे चाळणी केलेल्या बियाण्यास किंमत मिळणे आवश्यक आहे.
- भगवान शेळके,
हरबरा बिजोत्पादक शेतकरी, शिरपूर, ता. बुलडाणा.