मुस्लिमांवरील अत्याचार थांबविण्यासाठी मुक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:52 PM2017-09-15T19:52:25+5:302017-09-15T19:52:52+5:30

लोणार : म्यानमार देशातील  ब्रम्हा याठिकाणी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर  होणारे अन्याय थांबवावेत या मागणीसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसिल कार्यालयावर १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश कव्हळे यांना देण्यात आले.

Muk Morcha to stop the atrocities against Muslims | मुस्लिमांवरील अत्याचार थांबविण्यासाठी मुक मोर्चा

मुस्लिमांवरील अत्याचार थांबविण्यासाठी मुक मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देहजारो मुस्लीम बांधव धडकले तहसिल कार्यालयावरम्यानमारमध्ये मुस्लीम नागरिकांवर होत असलेले अत्याचार थांबविण्याची मागणीमागण्यांचे निवेदन तहसिलदारांना सादर

किशोर मापारी 
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : म्यानमार देशातील  ब्रम्हा याठिकाणी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर  होणारे अन्याय थांबवावेत या मागणीसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसिल कार्यालयावर १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश कव्हळे यांना देण्यात आले.
शहरातील जामा मजीद चौकापासून पासून दुपारी २ वाजून ३० मिनिटानी मूक मोर्चाला सुरुवात झाली़ . मूक मोर्चा मध्ये सहभागी नागरिकांच्या हातात 'रोहिंग्या मुसलमान पर अत्याचार बंद करो “  या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. सकाळी अकरा वाजेपासून शहर व तालुक्यातील मुस्लीम समाजबांधव जामा मजीद भागात जमायला सुरुवात झाली होती . सर्व मुस्लीम बांधवांनी कुठलेही घोषणाबाजी न करता तसेच वाहतुकीला अडथळा न येऊ देता शांतेत मूक मोर्चा काढला .या शांततामय मूक मोर्चामुळे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे .   
शिस्तीचे दर्शन
जामा मजीद पासून सुरू झालेल्या मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले़ . जामा मजीद चौक ते थेट मा.बसवेश्वर चौकापर्यंत मोर्चेकऱ्यांची रांग लागली होती़. मोर्चेकरी अतिशय शिस्तबद्धरित्या तहसिल कार्यालयापर्यंत पोहोचले तर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांसह नागरिकांना जागो-जागी जागाही करून देण्यात येत होती.
२ हजारांवर बांधव
मूक मोर्चात सुमारे २ हजारांवर मुस्लीम बांधव सहभागी झाले होते़. कॉंग्रेस नेते बादशहा खान , नगर परिषद आरोग्य सभापती शेख समद, तालुका उपाध्यक्ष अन्नू सर , रौनक अली, हाजी महेमूद सेठ, हाजी नसीम सर , हाजी रिजवान ,एजाज खान , लुकमान कुरेशी , इम्रान खान,अशोक वारे, अतिक कुरेशी , हाशम कुरेशी यांचे सह हजारो मुस्लीम बांधव शांतेत मूक मोर्चात सहभागी झाले .

Web Title: Muk Morcha to stop the atrocities against Muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.