पालिकेचे हगणदरीमुक्तीचे प्रयत्न निष्फळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:11 AM2017-08-09T00:11:41+5:302017-08-09T00:15:28+5:30

खामगाव :    शहरातील नागरिकांच्या सहकार्याचा अभाव आणि  राजकीय पदाधिकार्‍यांची उदासिनता या प्रमुख दोन कारणांमुळे  खामगाव नगर पालिकेचे हगणदरी मुक्तीचे प्रयत्न निष्फळ ठरणार  असल्याचे दिसून येते. उपरोक्त कारणांमुळेच की काय? जिल्ह्यातील  सर्वात मोठय़ा आणि बलाढय़ नगर पालिकेच्या स्वच्छता अभियानाची  जिल्हा स्तरीय तपासणी थंडबस्त्यात पडली आहे.

Municipal corporation's efforts to freeze the debacle! | पालिकेचे हगणदरीमुक्तीचे प्रयत्न निष्फळ!

पालिकेचे हगणदरीमुक्तीचे प्रयत्न निष्फळ!

Next
ठळक मुद्दे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची जिल्हास्तरीय तपासणी थंड बस्त्यात!शहरातील नागरिकांच्या सहकार्याचा अभाव  राजकीय पदाधिकार्‍यांची उदासिनता

अनिल गवई । 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :    शहरातील नागरिकांच्या सहकार्याचा अभाव आणि  राजकीय पदाधिकार्‍यांची उदासिनता या प्रमुख दोन कारणांमुळे  खामगाव नगर पालिकेचे हगणदरी मुक्तीचे प्रयत्न निष्फळ ठरणार  असल्याचे दिसून येते. उपरोक्त कारणांमुळेच की काय? जिल्ह्यातील  सर्वात मोठय़ा आणि बलाढय़ नगर पालिकेच्या स्वच्छता अभियानाची  जिल्हा स्तरीय तपासणी थंडबस्त्यात पडली आहे.
 खामगाव शहरातील उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी, स्वच्छ  महाराष्ट्र अभियानातंर्गत शहरातील विविध भागातील सर्वेक्षण  करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर पुन्हा फेर सर्वेक्षण करण्यात आले.  यामध्ये   बांधकामासाठी ३२५0 शौचालयांचे  उद्दीष्ट ठरविण्यात  आले. या उद्दीष्टापैकी २७१४ शौचालयांच्यावर शौचालयाचे  बांधकाम पुर्णत्वास आले असून, ५३६ शौचालयाच्या बांधकामाचे  भीजत घोंगडे आहे.  या शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असल्याने,  पालिकेला स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत खोडा निर्माण  झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शौचालयाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी ४७  जणांचे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये एका  सदस्यांकडे ४0 जणांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  पालिकेतील सर्वच विभागातील कर्मचार्‍यांचा या पथकामध्ये समावेश  करण्यात आला असून, यादीचे विक्रेंद्रीकरण प्रत्येकाची जबाबदारी  निश्‍चित करण्यात आली होती. दरम्यान, २0 जून पासून पालिका  प्रशासनाने केलेल्या कडक अंमलजावणीमुळे शहरातील १३ पैकी  १0 ठिकाणे हगणदरीमुक्त करण्यास पालिकेला यश आले. मात्र,  बाळापूर फैल, किसन नगर, ओंकारेश्‍वर स्मशानभूमी या ठिकाणी  पालिका प्रशासन हगणदरीमुक्तीसाठी मेटाकुटीस आले आहे. ही  ठिकाणे हगणदरी मुक्तीसाठी पालिका प्रशासनाला नागरिकांसोबतच,  राजकीय पदाधिकार्‍यांकडूनही सहकार्याची अपेक्षा असल्याचे दिसून  येते. जिल्ह्यातील इतर पालिका प्रमाणे खामगाव शहरातील राजकीय  पदाधिकार्‍यांनी मतभेद विसरून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या  उद्दीष्टपूर्ती सहकार्य केल्यास खामगावचे हगणदरीचे स्वप्नं पूर्ण होवू  शकते, एवढे मात्र निश्‍चित!

मंगळवारी एकाची पोलीस स्टेशन वारी!
उघड्यावर शौचास गेलेल्या एका इसमास मंगळवारी चांगलीच किंमत  चुकवावी लागली. सकाळी उघड्यावर शौचास गेलेल्या बाळापूर  फैलातील एका इसमास नगर पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाने  पकडले. या इसमाला सकाळीच पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.   शहर पोलिस स्टेशनमध्ये या इसमाविरोधात कारवाई करण्यात आली.  ही कारवाई खामगाव नगर पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता तथा  आरोग्य पर्यवेक्षक नीरज नाफडे, आरोग्य निरिक्षक अनंत निळे, गुड  माँर्निंग पथक प्रमुख एस.के.देशमुख,  सुभाष शेळके, मोहन अहीर  यांनी केली.

..तर संपूर्ण परिवारावर कारवाई!
खामगाव शहरातील ३ ठिकाणे हगणदरीमुक्तीसाठी पालिका  प्रशासनाकडून केले जाणारे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. परिणामी,  मेटाकुटीस आलेल्या पालिका प्रशासनाने उघड्यावरील हगणदरी  रोखण्यासाठी, कठोर निर्णय घेतला आहे. खामगाव पालिका हद्दीत  उघड्यावर शौचास जाताना आढळून आल्यास, त्या इसमाच्या संपूर्ण  परिवारावर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी  धनंजय बोरीकर यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत नियुक्त  केलेल्या ४७ कर्मचार्‍यांना उघड्यावरील हगणदरी रोखण्या कामी  कुठलिही कुचराई खपवून घेतल्या जाणार नाही, असे सक्त निर्देश  दिले आहेत.

जिल्हास्तरीय समितीने दर्शविली होती निराशा!
 १९ मे रोजी खामगाव शहराची जिल्हा स्तरीय समितीकडून पाहणी  करण्यात आली होती. जिल्हा प्रशासन अधिकारी उदय कुरवलकर  यांनी तपासणी पथकाचे नेतृत्व केले होते. यावेळी अनेक बाबींवर  समाधान व्यक्त करण्यात आले असले तरी, काही बाबींबाबत प थकाने निराशा व्यक्त केली होती. दरम्यान, पथकाने सुचविलेल्या उ पाययोजनांमध्ये पालिका प्रशासनाकडून योग्य अंमलबजावणी  करण्यात आली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे खामगाव पालिकेची  जिल्हा स्तरीय तपासणी थंडबस्त्यात असल्याची धक्कादायक बाब  समोर आली आहे. 

क्वालिटी कंट्रोलच्या निकषास पात्र!
खामगाव नगर पालिकेची स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत जिल्हा स् तरीय तपासणी रखडली असली तरी, स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत  शौचालय निर्मितीत पालिकेने ८१ टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे.  खामगाव नगर पालिकेने शौचालय निर्मितीत पूर्ण केलेले उद्दीष्ट हे  जिल्ह्यातील इतर पालिकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे ‘ क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया’च्या निकषास खामगाव नगर पालिका  पात्र ठरली आहे.

हगणदरीमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज!
 स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीसोबतच उघड्यावरील  हगणदरी रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात  आहे. मात्र, शहरातील नागरिकांकडून या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद  मिळत असल्याचे दिसून येते. सामाजिक संस्थांचाही स्वच्छ महाराष्ट्र  अभियानात अपेक्षीत प्रतिसाद नसल्याची वस्तुस्थिती असून,  राजकीय पदाधिकार्‍यांकडून या अभियानाकडे कानाडोळा केल्या जा त आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर स्वच्छ आणि हगणदरी मुक्त  करण्यासाठी राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि  नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा होत  आहे. 

Web Title: Municipal corporation's efforts to freeze the debacle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.