नगर पालिका निवडणुकीत सगे-सोयरेही आमने-सामने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 02:17 PM2019-03-17T14:17:32+5:302019-03-17T14:17:36+5:30
सिंदखेड राजा: येथील नगर परिषदेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पालिका निवडणुकीत सगे सोयरे आमने-सामने असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे.
- काशिनाथ मेहेत्रे
सिंदखेड राजा: येथील नगर परिषदेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पालिका निवडणुकीत सगे सोयरे आमने-सामने असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे.
सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणूकीत दहा प्रभागामधे शिव सेना भाजपा युतीचे व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे एकास एक ऊमेदवार आमने सामने रींगनात आहेत. तर पाच प्रभागात युती, आघाडी व बहुजन महासंघ वंचीत आघाडी अशी तीहेरी लढत होणार आहे. तर एका प्रभागात चौरंगी लढतीचे चीत्र स्पष्ट झाले. राष्ट्रवादी पक्षाकडुन प्रभाग दोन अ आणी तीन अ या दोंन्ही प्रभागात रुख्मण राधाजी तायडे ह्या एकाच महीला ऊमेदवाराला ऊभे करण्यात आले आहे. तर त्यांच्या सख्या जाऊबाई द्रोपती बाबुराव तायडे प्रभाग दोन ब मधुन आणि त्यांच्या चुलत जाऊबाई चंद्रकला मंजाजी तायडे प्रभाग आठ क मधुन रा.का. पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत. तर शिवसेना-भाजपची युती असून प्रभाग दोन ब मधून भिवसन एकनाथ ठाकरे हे शिवसेने कडून तर प्रभाग तीन अ मधुन मीनाक्षी भीवसन ठाकरे भाजप कडून पती पत्नीला रिंंगनात ऊभे आहेत. शिवसेनेचे प्रभाग तीन ब मधुन म्हतारजी ठाकरे आणी प्रभाग आठ ब मधुन द्रोपदी ठाकरे या पती पत्नीला ऊमेदवारी देऊन शिवसेनेने निवडणूक रिंगनात ऊभे केले. महाभारतातील लढाई प्रमाणे ही निवडणूक जवळचे नाते गोते विसरुन एकमेकांच्या विरोधात होत आहे.
काही मानसे पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे पक्षात दिसत असली तरी ती मनाने मात्र दुखावली गेल्याचे बोलल्या जात आहे. गेल्या पंधरा वर्षापूर्वी जनतेमधून नगर अध्यक्ष पदाची प्रथमच निवडणुक घेण्यात आली होती.
त्या मध्ये शिवसेनेच्या कमल मेहेत्रे नगराध्यक्ष झाल्या होत्या. परंतु या निवडणूकी मध्ये कमल मेहेत्रे यांचे पती शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मेहेत्रे निवडणूकीपासून कोसो दुर दीसत आहे.
तर ज्यांनी नगर अध्यक्ष पदाच्या आरक्षणाचा लढा नागपुर हायकोर्टात लढला. त्यामुळे नगर अध्यक्ष पद हे सर्व साधारण जागे साठी सुटले मात्र त्याच राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगराध्यक्षाला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते नाराज आहेत. नगर अध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांना सुध्दा लोकसभेचे जातीचे समीकरण जुळवण्यासाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मीळाली नाही. काँग्रेसचे जगन ठाकरे, राजेश देशमुख अशी अनेक नेते मंडळी दुखावल्याचे चित्र आहे.