खून प्रकरणात जन्मठेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:01 AM2017-09-29T01:01:34+5:302017-09-29T01:01:45+5:30

पिंपळगाव राजा: भालेगाव येथे चार वर्षांपूर्वी एका युवकाचा  तीक्ष्ण हत्याराने वार करून  निर्घृण खून करण्यात आला होता.  या न्यायप्रविष्ट खटल्याचा २८ सप्टेंबर रोजी खामगाव  न्यायालयाने निकाल देऊन या खून प्रकरणातील चार आरोपीं पैकी एका मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर  तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.

Murder case case! | खून प्रकरणात जन्मठेप!

खून प्रकरणात जन्मठेप!

Next
ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून झाली होती युवकाची हत्यातिघांची निर्दोष सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव राजा: भालेगाव येथे चार वर्षांपूर्वी एका युवकाचा  तीक्ष्ण हत्याराने वार करून  निर्घृण खून करण्यात आला होता.  या न्यायप्रविष्ट खटल्याचा २८ सप्टेंबर रोजी खामगाव  न्यायालयाने निकाल देऊन या खून प्रकरणातील चार आरोपीं पैकी एका मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर  तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम भालेगाव येथील  एसटी बसस्थानकावर २२ ऑक्टोबर २0१३ रोजी शे. रईस शे.  गणी या युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृणपणे खून  करण्यात आला होता. या खुनाच्या आरोपाखाली शे. मोईन शे.  मुन्शी, शे. मोसीन शे. मुन्शी, शे. मतीन शे. मुन्शी, जुबेदाबी शे.  मुन्शी या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या  बहुचर्चित खून प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय  क्र.२ चे न्यायाधीश रा.म. पाथाडे यांच्यासमोर झाली. सरकारी  पक्षाच्यावतीने अँड. आळशी यांनी काम पाहिले.
या प्रकरणातील मृतक शे. रईस शे. गणी आणि आरोपी शे. मोईन  शे. मुन्शी, शे. मोसीन शे. मुन्शी, शे. मतीन शे. मुन्शी, जुबेदाबी  शे. मुन्शी यांच्यात शेताच्या वादातून जुने वैमनस्य निर्माण झाले  होते. दरम्यान, मृतकाच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग  लावून ती जाळण्यात आली होती. त्यावरून आरोपी व मृतकात  वाद झाला व आरोपीने भालेगाव बसस्थानकावर मृतक शे. रईस  शे. गणी याची निर्घृण हत्या केली होती. त्या खून प्रकरणाचा त पास ठाणेदार आर.ए. तळेकर यांनी करून आरोपीविरुद्ध  खामगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खून  प्रकरणाचा निकाल २८ सप्टेंबर रोजी न्यायालयाने दिला असून,  मुख्य आरोपी शे. मोईन शे. मुन्शी याला जन्मठेपेची शिक्षा  सुनावली आहे तर शे. मोसीन शे. मुन्शी, शे. मतीन शे. मुन्शी,  जुबेदाबी शे. मुन्शी या तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
या बहुचर्चित न्याय प्रविष्ठ प्रकरणाचा ठाणेदार सुरेंद्र अहेरकर व  पोहेकॉ बाळू डाबेराव यांनी पाठपुरावा केला. अखेर गुरुवारी मु ख्य आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्याने मृतकाला न्याय  मिळाला, असे मत या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे.  

तिघांची निर्दोष सुटका
या खून प्रकरणाचा निकाल २८ सप्टेंबर रोजी न्यायालयाने दिला  असून, मुख्य आरोपी शे. मोईन शे. मुन्शी याला जन्मठेपेची शिक्षा  सुनावली आहे तर शे. मोसीन शे. मुन्शी, शे. मतीन शे. मुन्शी,  जुबेदाबी शे. मुन्शी या तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.

Web Title: Murder case case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.