दागिण्यांसाठी केला महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:53 AM2020-11-25T11:53:46+5:302020-11-25T11:56:01+5:30

अंगावरील सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेण्याच्या उद्देशाने महिलेचा गळा आवळून खून केला.

Murder of a woman for jewelry | दागिण्यांसाठी केला महिलेचा खून

दागिण्यांसाठी केला महिलेचा खून

Next
ठळक मुद्दे ४० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागीने अज्ञात चोरट्यांने लंपास केले.महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव: मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या नागेशवाडी येथील एका ५५ वर्षीय महिलेच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या उद्देशाने महिलेचा गळा आवळून खून करत संबंधीत महिलेने आत्महत्या केल्याचे भासविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी मृत महिलेच्या दीराने डोणगाव पोलिस ठाण्यात २४ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेशवाडी (ता. मेहकर) येथील गव्हाळीची टेकडी परिसरात असलेल्या शेतात विमलबाई मधुकर लठाड (५५) या कामासाठी गेल्या होत्या.  दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेण्याच्या उद्देशाने महिलेचा गळा आवळून खून केला. सोबतच महिलेच्या गळ्यातील २० गहूमणी असलेल डोरले, चांदीच्या हातातील पाटल्या, चांदीचे पायातील दोन कडे असे जवळपास ४० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागीने अज्ञात चोरट्यांने लंपास केले. सोबतच महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून दिल्याची तक्रार मृत महिलेचा दीर रुस्तम काशीराम लठाड यांनी डोणगाव पोलिस ठाण्यात २४ नोव्हेंबर रोजी दिली. 
त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेचे गांभिर्य पाहता  अप्पर पोलिस अधीक्षक बनसोडे, मेहकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी, डोणगावचे ठाणेदार दीपक पवार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते.  पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी राठोड हे करीत आहेत.

Web Title: Murder of a woman for jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.