कापूस वेचण्यास गेलेल्या महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:53 IST2017-11-11T00:51:56+5:302017-11-11T00:53:03+5:30

जळगाव जामोद: आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या  महिलेचा अज्ञात आरोपीने खून करून पुरावा मिटविण्यासाठी एका  कोरड्या विहिरीत प्रेत टाकून त्यावर पालापाचोळा व माती लोटून पुरावा  नष्ट करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील आसलगाव  शिवारात घडून आला.

murder of a woman who went to sell cotton | कापूस वेचण्यास गेलेल्या महिलेचा खून

कापूस वेचण्यास गेलेल्या महिलेचा खून

ठळक मुद्देविहिरीत प्रेत टाकलेआरोपीचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या  महिलेचा अज्ञात आरोपीने खून करून पुरावा मिटविण्यासाठी एका  कोरड्या विहिरीत प्रेत टाकून त्यावर पालापाचोळा व माती लोटून पुरावा  नष्ट करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील आसलगाव  शिवारात घडून आला. याप्रकरणी जळगाव पोलिसांनी भादंविच्या कलम  ३0२, २0१ अन्वये गुन्हा नोंदविला असून, पोलीस पथक आरोपीचा शोध  घेत आहे.
हरिभाऊ पंढरी इंगळे (वय ४६) आसलगाव यांनी दिलेल्या तक्रारीत असे  म्हटले आहे की, त्यांची पत्नी सुनीता (वय ३७) ही गावाला लागून  असलेल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्याकरिता गेली असता सायंकाळी  ती शेतात नव्हती. कापसाचे गाठोडे व चपला शेताता होत्या. आजूबाजूच्या  शेतात शोध घेतला; परंतु सुनीता दिसून न आल्याने जळगाव पोलिसात  तक्रार दाखल केली. पोलिसांसमवेत तपास केला असता काही अंतरावर  असलेल्या एका कोरड्या विहिरीत सुनीताचे प्रेत दिसून आले. या प्रेतावर  पालापाचोळा व माती झाकलेली होती. सुनीताच्या शरीरावर जखमा होत्या. 
यावरून आधी अज्ञात आरोपीने खून करून नंतर हे प्रेत विहिरीत टाकले  असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत  कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणाचा तपास पोलीस  निरीक्षक प्रदीप साळुंके यांचे मार्गदर्शनाला सहायक पोलीस निरीक्षक  मानसिंग चव्हाण हे करीत आहे. 

Web Title: murder of a woman who went to sell cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.