बुलडाण्याच्या  जिजामाता महाविद्यालयात रंगली सुरांची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:41 PM2018-01-17T14:41:13+5:302018-01-17T14:42:37+5:30

बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंतीच्या पर्वावर स्नेहसंमेलनात एका विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

musical concert in Buldana Jijamata College | बुलडाण्याच्या  जिजामाता महाविद्यालयात रंगली सुरांची मैफल

बुलडाण्याच्या  जिजामाता महाविद्यालयात रंगली सुरांची मैफल

Next
ठळक मुद्दे मैफलीची सुरुवात संगीत विभाग प्रमुख प्रा सुरेंद्र शेजे यांनी शंकर महादेवन यांच्या आवाजातील गणनायकाय गणदैवताय या गीताने गेली. एक प्यार का नगमा है...शोर चित्रपटातील गीत प्रा.किरण टाकळकर यांनी सादर केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंतीच्या पर्वावर स्नेहसंमेलनात एका विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी व हिंदी गीतांच्या मैफलीची सुरुवात संगीत विभाग प्रमुख प्रा सुरेंद्र शेजे यांनी शंकर महादेवन यांच्या आवाजातील गणनायकाय गणदैवताय या गीताने गेली. प्रा शेजे यांनी गायलेल्या गीताला उपस्थित रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. पारसमणी चित्रपटातील हसता हुआ नुरानी चेहरा हे गीत प्रा. किरण टाकळकर व प्रा. स्नेहल तायडे यांनी सादर कएले. याराना चित्रपटातील छुकर मेरे मनको हे गीत प्रा. सुभाष मोरे यांनी गायले. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली ही लावणी प्रा. प्रिती आराख यांनी गायली व मैफलीला एक वेगळीच रंगत आली व रसिकांनी मनसोक्त दाद दिली. एक प्यार का नगमा है...शोर चित्रपटातील गीत प्रा.किरण टाकळकर यांनी सादर केले. सध्याच्या काळात रिमीक्स व फ्युजन गाण्यांची आवड सगळ्यांच आवडते हाच रसिकांचा धागा पकडुन प्रा. गजानन लोहटे यांनी क्या हुवा तेरा वादा, लग ज्या गले या सारख्या विविध गीतांची श्रृंखला फ्युजन प्रकारात सादर करुन तरुणाईला आकर्षीत केले.लख्ख पडला प्रकाश हा...जाऊ द्या बाळासाहेब या चित्रपटातील हा गोंधळ दिग्वविजयसिंग राजपुत याने सादर  करुन रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळविली. मैफलीच्या समारोपाला लयभारी चित्रपटातील गाजलेले  माऊली... माऊली  हे गीत प्रा सुरेंद्र शेजे यांनी गायले. या मैफलीला कु योगीता अहिरे, कु अनघा पाटील,कु वैशाली सोनुने, कु वैष्णवी पुराणीक यांचा कोरस होता. या संगीत मैफलीचे संगीत नियोजन प्रा. सुरेंद्र शेजे यांच्या मार्गदर्शनाखाली होते यात कि बोर्ड- सिंथेसायझर -श्रीकांत ढवळे, आक्टोपॅड-नंदकिशोर मानेकर, ढोलक- आतिश राजपुत यांची साजेशी व सुंदर साथसंगत लाभली. यासंगीत मैफलीचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ई.जे. हेलगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यासंगीत मैफलीचे संचालन प्रा. प्रिती आराख यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Web Title: musical concert in Buldana Jijamata College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.