निसर्गासोबत जगण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:01 AM2020-10-16T11:01:32+5:302020-10-16T11:05:36+5:30

My Earth या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल.

‘My Earth’ campaign to live with nature | निसर्गासोबत जगण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान

निसर्गासोबत जगण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदुषण रोखण्यासह निसर्ग संवर्धनाचे उपक्रमराबवलेल्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

खामगाव : जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे, पर्यावरण, वातावरणातील बदलांनुसार घडणाºया घटनांचे परिणाम सहन करण्याची सवय निर्माण व्हावी, यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग ‘माझी वसुंधरा’ अभियानातून ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या नागरिकांना सांगितला जाणार आहे. त्यासाठी २ आॅक्टोबर ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जातील. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनाºयांची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणाºया बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जाईल.


- ६६७ संस्थामध्ये अभियान
माझी वसुंधरा अभियान राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवले जाणार आहे. त्यामध्ये अमृत योजनेत असलेल्या २७ महापालिका व १६ अ वर्ग नगर परिषदा, नगर परिषद-२२६, नगर पंचायती-१२६ व ग्रामपंचायती-२७२ (१० हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या) आहेत. त्यापैकी रायगड, रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यांमध्ये १० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असल्याची अट शिथिल करण्यात आली आहे.


- कामांचे होणार मूल्यमापन
अभियानाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक घटकासाठी गुण ठरले आहेत.  मूल्यांकनामध्ये प्रत्येक संस्था संवर्गातील तीन संस्थांना ५ जून रोजी बक्षिस वितरण केले जाणार आहे. तसेच राज्यस्तरावरही निवड केली जाईल. 

 

Web Title: ‘My Earth’ campaign to live with nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.