लोणार सरोवर परिसरात ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 05:02 PM2017-12-22T17:02:57+5:302017-12-22T17:05:01+5:30
लोणार : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला चळवळीचे स्वरूप देण्याचा निर्णय लोणार नगर परिषदेणे घेतला आहे. याचाच भाग म्हणून ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या अभियानाला २० डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे.
लोणार : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला चळवळीचे स्वरूप देण्याचा निर्णय लोणार नगर परिषदेणे घेतला आहे. याचाच भाग म्हणून ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या अभियानाला २० डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगर परिषदेने ‘स्वच्छता अॅप’ कार्यन्वीत केले असून, परिसरातील अस्वच्छता संदर्भात मोबाईलच्या सहाय्याने ‘स्वच्छता अॅप’वर घरबसल्या तक्रार करता येणार आहे. लोणार शहरात सध्या पहाटेपासून शहराच्या प्रत्येक विभागामध्ये स्वच्छता अधिकारी, सफाई कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी हे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहेत. सकाळी तसेच रात्रीच्या वेळीदेखील सफाईचे काम सुरु आहे. स्वच्छतेच्या या चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढवा यासाठी शाळा, महाविद्यालय तसेच प्रभागामध्ये माझा प्रभाग, स्वच्छ स्पर्धा लोणार नगर परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहे. जागतीक दर्जाचे पर्यटन असलेल्या लोणार शहरातील गटार साफ नाही, कचरा जात उचलला नाही, सार्वजनिक शौचालय साफ नाहीत अशा एका ना अनेक प्रकरच्या तक्रारीसाठी आता नागरिकांना नगर परिषद मध्ये येण्याची गरज नाही. केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने विकसित केलेल्या मोबाईलवरील ‘स्वच्छता अॅप’च्या सहाय्याने नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे. स्मार्ट फोनच्या सहाय्याने घरी बसून क्षणार्धात तक्रार करता येणार असल्याने नगर परिषदेचे हायटेक पाऊल स्वच्छ शहराला बळकटी अणणारे आहे. स्वच्छता अॅप वापरण्यास अगदी सुलभ आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी दिली. स्वच्छता अॅप डाऊनलोड केल्यानंतर पसंतीची भाषा निवडावी लागणार आहे. वन टाईम पासवर्ड नंतर छायाचित्र काढावे आणि नंतर सर्वसाधारणपणे आढळनाºया तक्रारी जसे मृत प्राणी आहे, कचºयाचे ढीग आहे, कचरा गाडी आली नाही, यातील जी तक्रार लागू असेल त्यावर क्लिक केल्यानंतर त्या परिसराचे लोकेशन व लँडमार्क स्थळ माहिती भरावी लागणार आहे. तक्रार पोस्ट करताच तक्रार पोहचल्याचा संदेश दिसणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी दिली. ... बॉक्स... स्वच्छता राखणाºया कर्मचाºयांचा होणार सन्मान नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दररोज सायंकाळी शहरात साफ सफाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. यामुळे शहरात रात्रीच्या वेळेस स्वच्छता दिसून येत आहे. दिवस-रात्र सफाई करून स्वच्छता राखणाºया कर्मचाºयांचा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात येणार आल्यामुळे त्यांनाही शहर स्वच्छ करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.